---Advertisement---

न्यूझीलंडला ‘अंडरडॉग’ म्हटल्यावर आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…

On: रविवार, नोव्हेंबर 14, 2021 5:33 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना प्रथमच हे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ यंदा प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. या सामन्याच्या आधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने आपल्या संघाला अंडरडॉग म्हणण्याविषयी एक विधान केले आहे.

काय म्हणाला विलियम्सन?
एका ऐतिहासिक अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन पत्रकारांना सामोरा गेला. आपल्या संघाला अंडरडॉग म्हणण्याविषयी त्याने म्हटले,
“आमच्यासाठी याचा काही अर्थ नाही. आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो आणि एक संघ म्हणून सुधारणा करत राहण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो. वैयक्तिक टॅग किंवा तत्सम कशावरही आमचे नियंत्रण नाही. हे खूप मेहनतीचे प्रतिबिंब आहे. परंतु, अंतिम सामना आमच्यासाठी इतर सामान्यांसारखाच सामना आहे आणि आम्ही पुन्हा छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू.”

उपांत्य फेरीत केला इंग्लंडचा पराभव
न्‍यूझीलंड संघाने ब गटातून दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीच्या रोमांचक सामन्‍यात न्यूझीलंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. डेरिल मिचेलने नाबाद अर्धशतक व अष्टपैलू जिमी निशामने तुफानी २७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. न्यूझीलंडला पुन्हा एकदा या खेळाडूंकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडप्रमाणे ऑस्ट्रेलिया देखील आपल्या पहिल्या टी२० विश्वचषक विजेतेपदासाठी आतूर असेल.

अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडचा संभाव्य संघ-
मार्टिन गप्टिल, डॅरिल मिचेल, केन विलियम्सन (कर्णधार), टिम सिफर्ट (यष्टिरक्षक), जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, ऍडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट आणि टीम साउदी.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!

घरवापसी! विराट पत्नी अनुष्का अन् लेकीसह युएईतून परतला मुंबईत, पाहा व्हिडिओ

सावधान! तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरमूळे विराटचा सात वर्ष जुना विक्रम धोक्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---