मेलबर्न। आज(29 डिसेंबर) न्यूझीलंडला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 247 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्याचबरोबर त्यांना 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही 2-0 अशा पिछाडीला सामोरे जावे लागले आहे.
असे असले तरी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने चाहत्यांशी संवाद साधत सर्वांची मने जिंकली आहेत.
या सामन्यासाठी विक्रमी प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते. यामध्ये जवळ जवळ 16 हजारांच्या आसपास न्यूझीलंडच्या चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी तिकीटे खरेदी केली होती. या काही चाहत्यांचे त्यांच्या जवळ जाऊन विलियम्सनने आभार मानले आहेत.
तो सामना संपल्यानंतर चाहत्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्याशी त्याने संवाद साधला. तो म्हणाला, ‘मला माहित आहे आपण काही नियमांमुळे बांधले गेलो आहे, पण मला आशा आहे तूम्ही सर्वजण योग्य वागत आहात. तूम्ही या कसोटीदरम्यान जो पाठिंबा दिला तो खास होता आणि त्याचे कौतुक आहे. मला असे वाटते फुटबॉलपटूंना असेच काहीसे वाटत असेल, अगदी अशा निकालानंतरही. पण तूमचा उत्साह खरंच प्रेरणादायी आहे. आम्ही तूमचे आभार मानतो.’
विलियम्सनचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सनरायझर्स हैद्राबाद या आयपीएलमधील संघाच्या ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे. विलियम्सन हैद्राबाद संघाचा कर्णधार आहे.
Kane Williamson doing Kane Williamson things 🧡
Captain, Leader, Legend in every sense 🙌#AUSvNZ #SteadyTheShip #OrangeArmy pic.twitter.com/fNXK2lwdhg
— SunRisers Hyderabad (@SunRisers) December 29, 2019
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 467 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडला पहिल्या डावात केवळ 148 धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 319 धावांची मोठी आघाडी घेतली.
तसेच दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने 5 बाद 168 धावांवर घोषित करत न्यूझीलंडला विजयासाठी 448 धावांचे आव्हान दिले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव 71 षटकात 240 धावांवर संपुष्टात आला.
न्यूझीलंडकडून टॉम ब्लेंडेलने 121 धावांची शतकी खेळी करत एकाकी झूंज दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता न आल्याने न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडकडून या डावात दुखापतीमुळे ट्रेंट बोल्टने फलंदाजी केली नाही.
टीम इंडियात कमबॅक करण्याबद्दल भुवनेश्वर कुमारने केले मोठे भाष्य, म्हणाला…
वाचा👉https://t.co/YxUHha46Eg👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #bhuvneshwarkumar
— Maha Sports (@Maha_Sports) December 29, 2019
बर्थडे बॉय यशस्वी जयस्वालने केला मोठा कारनामा; टीम इंडियाचीही मालिकेत विजयी आघाडी
वाचा- 👉https://t.co/XYqqfUJUiD👈
#म #मराठी #Cricket @yashasvi_j
— Maha Sports (@Maha_Sports) December 29, 2019