---Advertisement---

हे तीन दिग्गज निवडणार टीम इंडियासाठी नवीन कोच?

---Advertisement---

बीसीसीआयने मंगळवारी(16 जूलै) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 जूलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या तिघांना दिली जाण्याची शक्यता आहे.

याबद्दल आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ‘या तिघांची अजून अधिकृत निवड झालेली नाही. पण यावर चर्चा सुरु आहे. यावर आत्ता काही बोलणे योग्य नाही.’

तसेच या तिघांमधील एकाने सांगितले की ‘मी माझ्या पदाबद्दल तेव्हाच बोलू शकेल जेव्हा प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या हातात नियुक्तीचे अधिकृत पत्र असेल.’

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कपिल देव, गायकवाड आणि रंगास्वामी या तिघांनीच महिला संघासाठी डब्ल्यूव्ही रमण यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती. तसेच याआधी व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर या तिघांचा समावेश असणारी सल्लागार समीती भारतीय पुरुष संघासाठी प्रशिक्षकाची निवड करत होती.

पण हे तिघेही आयपीएलच्या फ्रँचायझींना जोडलेले असल्याने त्यांच्या परस्पर हितसंबंधाचा मुद्दा मधे चर्चेत आला होता. त्यामुळे या तिघांनी सीओएकडून (सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमुन दिलेली समिती) त्यांच्या जबाबदारीबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणाची पडताळणी बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन करत आहेत.

बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांव्यतिरिक्त अन्य सपोर्ट स्टाफची नियुक्ती बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी करतील. तर एड हॉक सीएसी (सल्लागार समीती) मुख्य प्रशिक्षकाची निवड करेल.

सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे.

त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.पण त्यानंतर बीसीसीआय नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक या पदांसाठी हे अर्ज मागवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मनिष पांडे, कृणाल पंड्याची चमकदार कामगिरी

विश्वचषकादरम्यान इंग्लंडच्या या क्रिकेटपटूच्या भावाची झाली हत्या, तरीही तो खेळत होता संघासाठी

विश्वचषक जिंकला इंग्लंडने, सोशल मीडियावर चर्चा झाली टीम इंडियाची

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment