भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. परंतु सध्या रोहित त्याच्या प्रतिभेनुसार खेळताना दिसत नाहीये. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देवने रोहित्याचे या फॉर्मवर स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.
आयपीएल २०२२ मध्ये रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळातील संघ ठरला. रोहितचे स्वतःचे प्रदर्शन देखील निराशाजनक होते. त्याने हंगामातील १४ साम न्यांमध्ये एकही अर्धशतक केले नाही. त्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत विश्रांती दिली. माजी दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांच्या मते रोहित आफ्रिकी संघाविरुद्ध खेळला पाहिजे होता.
रोहित, बुमराह आणि विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत विश्रांती दिली गेल्यामुळे कपिलने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “याचा शोध लावणे खूप कठी आहे की, त्यांना आराम कसकाय दिला गेला आणि कोणाच्या सांगण्यावरून दिला गेला. निवडकर्त्यांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल”
रोहितच्या खराब फॉर्मविषयी देखील किपलने स्पष्ट भूमिका मांडली. “रोहित शर्मा चांगला खेळाडू आहे, यात कसलीच शंका नाही. पण त्याने १४ सामन्यांमध्ये एकही अर्धशतक केले नाहीये. प्रश्न उपस्थित होणारच. मत ब्रॅडमनचा विषय असो, सचिनचा असो किंवा विराट कोहलीचा असो. रोहितच उत्तर देऊ शकतो की, काय होत आहे. जास्त क्रिकेटमुळे असे होत आहे का ?”
कपिल देवच्या मते विराट आणि रोहितने क्रिकेटचा आनंद घेतला पाहिजे. विराट कोहलीही देखील मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये आणि त्याला देखील कपिलने यापूर्वीच सुनावले आहे. त्यांच्या मते खेळाडू कितीही मोठा असला, तरी सततच्या खराब प्रदर्शनानंतर त्याच्यावर प्रश्न आणि टाक ही होणारच. रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघ सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, त्याठिकाणी रोहित आणि विराट हे दोन्ही दिग्गज चांगले प्रदर्शन करतील, असी अपेक्षा चाहत्यांना आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बाद केल्यानंतर फलंदाजाच्या गळ्यात पडून केले सेलिब्रेशन, शमी पुजाराची मैत्री एकदा बघाच
बड्डे स्पेशल: फुटबॉलसाठीच जन्मलेला मेस्सी, वाचा त्याचे आश्चर्यकारक विक्रम
आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग राहिलेल्या पंचावर ओढावलीय चपला विकण्याची वेळ, पण का?