भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या पाठिच्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. तसेच तो आता कधी पुनरागमन करणार याबद्दल अजून कोणतीही माहिती बीसीसीआयने स्पष्ट केलेली नाही.
परंतू तो पुढील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
पण बुमराहच्या गोलंदाजी शैलीबद्दल भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठे विधान केले आहे. त्यानी बुमराहच्या दुखापतीचे कारण त्याच्या गोलंदाजीची शैली असल्याचे सांगितले आहे.
स्पोर्ट्स स्टारशी बोलताना कपिल म्हणाले, ‘जर तुमची गोलंदाजी तांत्रिकदृष्ट्या चांगली असेल तर तुम्ही प्रभावी कामगिरी करू शकता. बुमराहचे काय झाले आहे ते पहा, त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे त्याला दुखापत झाली.’
‘तो नेहमीच त्याच्या शरिरापेक्षा अधिक हाताचा वापर करतो. ज्यामुळे समस्या निर्माण होते. तूम्ही जर भुवनेश्वर कुमारला पाहिले तर लक्षात येईल तो त्याच्या शरिराचाही वापर करतो. अशावेळी त्यांची कारकीर्द दिर्घकाळ राहिल.’
बुमराहने आत्तापर्यंत 12 कसोटी सामन्यांत 62 बळी घेतले आहेत. तसेच 58 वनडेत 103 बळी घेतले आहेत आणि 42 टी20 सामन्यात 51 बळीही घेतली आहेत.
कपिल यांनी माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे उदाहरण देऊन सांगितले की, ‘ते शरिराचा वापर करत गोलंदाजी करायचे. ते तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज होते कारण त्यांनी शरीराचा वापर करत गोलंदाजी केली.’
त्याशिवाय कपिल यांनी फलंदाजीबाबत सुनील गावस्करांचेही उदाहरण दिले. ते म्हणाले, “सुनील गावस्कर तांत्रिकदृष्ट्या खूप चांगले फलंदाज होते. त्यांना जरी आत्ता वयाच्या 70 वर्षी बॅट हातात दिली तरी ते तांत्रिकदृष्या चांगली फलंदाजी करु शकतील.’
‘तसेच विरेंद्र सेहवाग, गुंडप्पा विश्वनाथ असे काही फलंदाज ‘Eye Player’ असतात. त्यांना पहायला मजा येते. सचिन अजून 5 वर्षे क्रिकेट खेळू शकतो. त्याच्याकडे चांगले फलंदाजीचे तंत्र आहे.’
मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या बनावट ट्विटर अकाऊंटवर संतापला सचिन तेंडुलकर, म्हणाला…
वाचा- ????https://t.co/uvpejwcD4t????#म #मराठी #TeamIndia #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) November 28, 2019
…म्हणून पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय ड्रायव्हरला केले जेवणासाठी आमंत्रित
वाचा- ???? https://t.co/BrZRzXfwCQ????#म #मराठी #TeamIndia #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 28, 2019






