साल 1983, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताला पहिल्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकून दिला होता. कपिल देव यांनी बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या भेदक गोलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या कपिल देव यांना आपल्याच संघातील एका खेळाडूची खूप भीती वाटायची. याचा खुलासा कपिल देव यांनी प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमन यांच्याशी बोलताना केला होता.
ते म्हणाले होते की, “श्रीनिवास वेंकटराघवन हे जेव्हा पण माझ्या आसपास असायचे, तेव्हा मी त्यांना भिऊन लपण्यासाठी जागा शोधायचो. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात संध्याकाळच्या वेळी टी ब्रेक असायचा. मात्र वेंकटराघवन हे टी आणि कॉफी ब्रेक नसावा या मताचे होते. मी त्यांना खूप भीत असायचो.”
“सुरुवातीला ते इंग्लिशमध्ये आमच्याशी बोलायचे. विशेष म्हणजे त्यांना खूप राग यायचा. पंच म्हणून काम पाहताना देखील ते लवकर फलंदाजास बाद देत नव्हते. गोलंदाजास ते रागाने पाहायचे. 1979 साली इंग्लंड दौऱ्यावर गेलो होतो. ते माझे कर्णधार होते. ते रागावतील या भीतीने मी त्यांच्यापासून दूर जाऊन लपायचो,” असे कपिल देव यांनी सांगितले होते.
ते म्हणाले होते, “त्यावेळी आमच्याजवळ बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर सारखे गोलंदाज होते. ते माझ्याकडे नेहमीच रागाने पहायचे. मी एका कोपऱ्यात बसून खूप नाष्टा करायचो. ते माझ्याकडे पाहून म्हणायचे की हा तर नेहमी खातच असतो,”
60 आणि 70 च्या दशकात बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर आणि वेंकटराघवन या चार जणांची फिरकी जोडी जगप्रसिद्ध होती. वेंकटराघवन यांनी 1983 साली निवृत्त घेतली होती. भारताकडून खेळताना 57 कसोटी सामन्यात 156 बळी घेतले होते. याच वेंकटराघवन यांचा आज (21 एप्रिल) 77 वा वाढदिवस आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रीनिवास वेंकटराघवन
पावरप्लेमधील धमाक्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा खास विक्रम, गुणतालिकेतही घेतली भरारी
रोहित अन् विराटवर दिसतोय वय, थकवा अन् जबाबदाऱ्यांचा दबाव? वाचा चेन्नई-मुंबईप्रमाणे का होतायत फ्लॉप