आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट -२० क्रिकेटचा समावेश झाल्यापासून क्रिकेटपटू आपल्या फिटनेसवर अधिक जोर देताना दिसून येत आहेत. तरीदेखील खेळाडूंना फिटनेसची समस्या जाणवत असते. अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी गोलंदाजांच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला आहे.
कपिल देव यांनी म्हटले की,” जर तुम्ही वर्षातून १० महिने क्रिकेट खेळत असाल तर दुखापतग्रस्त होण्याची भिती वाढते. आता क्रिकेट मूलभूत झाले आहे. एकतर तुम्ही गोलंदाजी करू शकता किंवा फक्त फलंदाजी. आमच्या वेळी आम्हाला सर्व काही करावे लागत असे. आता क्रिकेटमध्येही खूप बदल झाला आहे. अनेकदा पाहून दुःख होते की, एखादा गोलंदाज ४ षटक गोलंदाजी करून थकून जातो.”
“अनेक गोलंदाज तर असेही म्हणतात की, त्यांना नेटमध्ये ३ ते ४ षटक गोलंदाजी करण्याची अनुमती दिली जात नाही. आमच्या काळात आम्ही १० व्या ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजांना १० -१० षटक गोलंदाजी करायचो. मला नाहीत नाही हे योग्य होतं की नाही,परंतु आपली हीच मानसिकता असायला हवी. यामुळे फिटनेसही टिकून राहतो.”
नुकत्याच झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. ११ जणांच्या भारतीय संघात ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली होती. तरीदेखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
न्यूझीलंड संघाकडून केन विलियमसनने ५ वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवले होते. यामध्ये ग्रँडहोम आणि जेमिसन या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश होता. जेमिसनने पहिल्या डावात गोलंदाजी करताना, ५ गडी बाद केले होते. तर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. (Kapil dev says it’s strange to watch how today’s Bowlers tired after only 4 overs)
सामना झाल्यानंतर विराट कोहलीने म्हटले होते की, भारतीय संघात वेगवान अष्टपैलू गोलंदाजाची कमतरता जाणवली. आता भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत भारतीय संघ कुठल्या संघ संयोजनासह मैदानात उतरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक
नवीन संघ, नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडू! ‘या’ कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरेल श्रीलंका दौरा
भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या जीवावर युवराज सिंग आपल्या प्राणाची बाजी लावण्यास तयार