भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये दरवर्षी फ्रॅंचाईजी टी२० लीग आयोजित केल्या जातात. पुढील वर्षीपासून यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतही अशा टी२० लीग सुरू होणार आहेत. अशा स्थितीत वनडे व कसोटीच्या भवितव्याबाबत सातत्याने चर्चा होतेय. या दरम्यानच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) वनडे आणि कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली आहे.
वाढत्या टी२० लीग आणि अति क्रिकेटचा परिणाम खेळाडूंवर दिसून येत आहे. काही खेळाडूंनी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण देत अलीकडेच वनडे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. यात बेन स्टोक्ससारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेने २०२३ मध्ये होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका रद्द केली आहे. कारण, तिची तारीख क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रस्तावित टी२० लीग वेळीच येत आहे.
आयसीसीने खेळाडूंचे वर्कलोड व्यवस्थापित करण्याची जबाबदारी संबंधित देशांवर टाकली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट व टी२० लीग यांचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आयसीसीची असल्याचे कपिल देव यांनी म्हटले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, ‘क्रिकेट फुटबॉलच्या मार्गावर जाण्यास सुरूवात झाली आहे. टी२० लीगच्या वाढत्या प्रभावादरम्यान आयसीसीने वनडे आणि कसोटी क्रिकेट वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी पहिले पाऊल आयसीसीने टाकायला हवे.”
फुटबॉलमधील फिफा विश्वचषक तब्बल ४ वर्षांनी होत असतो. फुटबॉल खेळणारे देश क्रिकेटमध्ये जितके खेळतात तितके एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. खेळाडू त्यांच्या क्लबवर लक्ष केंद्रित करतात आणि ते फक्त विश्वचषकात देशासाठी खेळतात.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी लोटला जनसागर, व्हिडिओ होतोयं भन्नाट व्हायरल
भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार खूष! ‘हा एक चांगला अनुभव होता’ म्हणत थोपटली पाठ
‘त्याच्यावर टीका होतेय, कारण…’ भारताच्या माजी कर्णधाराने केली पंतची पाठराखण