भारतीय क्रिकेटपटूंच्या जिवनावर बरेच हिंदी चित्रपट निघाले आहेत. यामध्ये एमएस धोनीच्या बायोपिक ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ आणि सचिन तेंडुलकरच्या बायोपिक ‘सचिन- अ बिलियन ड्रीम’ यांचा समावेश आहे. यानंतर भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जिवनावर आधारित ‘८३’ हा हिंदी चित्रपट येणार आहे. तसा हा चित्रपट भारतीय संघाच्या १९८३ मधील विश्वविजेतेपदावर आधारित आहे.
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता ‘रणवीर सिंग’ याने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजीच प्रकाशित (रिलीज) होणार होता. परंतु कोविड-१९ मुळे करण्यात आलेल्या लॉकडानला लक्षात घेता, या चित्रपटाच्या प्रकाशनाची तारिख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता गृह मंत्रालयातील मार्गदर्शक सूचनांनुसार ५० टक्केपेक्षा अधिक क्षमता असलेले चित्रपटगृह खुले करण्यात येणार आहेत. त्यानुसार ८३ हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर (२८ मार्च) प्रकाशित होण्याची दाट शक्यता आहे.
अक्षयचा चित्रपट थांबवून रणवीरचा चित्रपट होणार प्रकाशित
माध्यमांतील वृत्तांनुसार, कोरोनामुळे रिलायन्स एंटरटेनमेंटचे दोन मोठे चित्रपट प्रकाशित व्हायचे राहिले आहेत. यात ८३ सह अक्षय कुमारचा सुर्यवंशी चित्रपटाचा समावेश आहे. सुरुवातीला होळीच्या दिनी सुर्यवंशी प्रकाशित करण्याची योजना होती. परंतु काही दिवसांत हॉलिवुड ऍक्शन चित्रपट ‘गॉडजिला वर्सेज कॉन्ग की’ प्रकाशित होणार असल्याचे वृत्त पुढे आले. त्यामुळे अक्षयच्या ऍक्शन सिनेमाऐवजी रणवीरचा ८३ प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय संघाच्या थरारक विजयामुळे चित्रपटाला फायदा
८३ चित्रपट सुरुवातीला प्रकाशित करण्यामागे अजून एक कारण आहे. ते म्हणजे, १९८३ सालच्या विश्वचषक विजयाची कथा जाणून घेण्यास आणि त्यावेळच्या क्षणांना पुन्हा एकदा पाहण्यास दर्शक उत्सुक आहेत. सोबतच नुकताच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मायभूमीत पराभूत करत जगभर विजयाचा डंका वाजवला आहे. त्यामुळे आनंदी क्रिकेट रसिकांचा या चित्रपटाला पाहण्याचा ओढ जास्त असेल.
कपिल देव यांची मुलगीही आहे चित्रपटाचा भाग
८३ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, याचे दिग्दर्शन प्रसिद्ध बॉलिवुड दिग्दर्शक कबीर खान यांनी केले आहे. अभिनेता रणवीर सिंगसह त्याची पत्नी आणि बॉलिवुड अभिनेत्री दिपीका पादुकोन हीदेखील चित्रपटाचा भाग आहे. ती कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. सोबतच कपिल देव यांची मुलगी अमिया देव हीदेखील चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे.
आपल्या वडिलांच्या बायोपिकमधून अमिया दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांची सहाय्यक दिग्दर्शक (असिस्टेंट डायरेक्टर) आहे. याव्यतिरिक्त ८३ या चित्रपटात भारताचे माजी क्रिकेटपटू संदिप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील हादेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर धवन चढणार कोर्टाची पायरी, ‘या’ प्रकरणात झाला गुन्हा दाखल
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचा थरार होणार सुरू, ‘हे’ संघ येणार आमने-सामने
पुजाराने केला खुलासा, ‘त्या’ सामन्यात केवळ चार बोटात बॅट पकडत केली होती फलंदाजी