बुधवारी(17 नोव्हेंबर) पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना कराची किंग्स विरुद्ध लाहोर कलंदर्स संघात पार पडला. या सामन्यात बाबर आझमच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कराचीने 5 गडी राखून लाहोर कलंदर्स संघाला पराभूत केले आणि पहिल्यांदाच पीएसएलचे विजेतेपद मिळवले.
कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या लीगच्या पाचव्या हंगामातील अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 134 धावा केल्या. त्यानंतर कराची किंग्सने बाबर आझमच्या शानदार खेळीच्या जोरावर 5 गडी गमावून 18.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. कराची किंग्सचा कर्णधार इमाद वसीमने विजयी चौकार मारत संघाला चषक जिंकवून दिला.
फायदेशीर ठरली बाबर – चॅडविक यांच्यातील भागेदारी
बाबरने 49 चेंडूंत नाबाद 63 धावांच्या खेळीत 7 चौकार ठोकले. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या 15 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. बाबरने वॉल्टन चॅडविकसह तिसर्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 61 धावांची भागीदारी केली. चॅडविकने 22 धावांचे योगदान संघाला दिले.
135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कराचीचा पहिला गडी शार्जिल खान 13 धावा करून बाद झाला. फखर जमानने त्याला समित पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. शार्जिलने 12 चेंडूत 2 चौकार ठोकले. त्यानंतर 11 धावांवर अॅलेक्स हेल्सला दिलबर हुसेनने त्रिफळाचीत केले. नंतर बाबरने वॉल्टनबरोबर डाव पुढे नेत संघाची धावसंख्या 100 पर्यंत नेली आणि विजयाचा पाया रचला. वॉल्टनने एका चौकाराच्या मदतीने 27 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर दिलबर हुसेनने त्याला पायचीत केले.
लाहोरच्या गोलंदाजांनी कराचीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी केली प्रयत्नांची पराकाष्टा
लाहोर संघाकडून हरीस रऊफने दोन गडी बाद केले. 18 व्या षटकातील सलग दोन चेंडूवर इफ्तिखार अहमदला 4 आणि शेरफान रदरफोर्डला 0 धावेवर बाद करून त्यांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. त्याशिवाय दिलबर हुसेनला 2 तर समित पटेलला एक विकेट मिळाली. मात्र ते कराची संघाला धावांचा यशस्वी पाठलाग करण्यापासून थांबवू शकले नाहीत.
Ladies and Gentlemen, presenting the champions of the #HBLPSLV:@KarachiKingsARY
Deano would be proud 💙❤️
#PhirSeTayyarHain #KKvLQ #HBLPSLV pic.twitter.com/p2mW2qNWuZ
— PakistanSuperLeague (@thePSLt20) November 17, 2020
लाहोरच्या डावाला लागली नजर
लाहोर कलंदर्स संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 134 धावा केल्या. सलामीवीर तमीम इक्बालने सर्वाधिक 35 धावांचे योगदान दिले. फखर जमानने 27 धावा केल्या. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. त्यानंतर संघाने केवळ 2 धावांच्या आत 3 गडी गमावले.
बाबर आझम म्हणाला, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. 11 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लाहोरचा पहिला गडी गारद झाला. त्यानंतर उमेद आसिफने त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर फखरला चालते केले. पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हाफिजला 2 धावांवर असताना कर्णधार इमाद वसीमने धावबाद केले.
कराचीच्या गोलंदाजांना मिळालं यश
लाहोर संघाच्या विकेट्स नियमित अंतराने पडत राहिल्या आणि 20 षटकांत संघ 7 बाद 134 धावाच करू शकला. कराचीकडून उम्मेद, वकास मकसूद आणि अर्शद इक्बाल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले तर इमादने एक बळी मिळवला.
रदरफोर्डला 7 दिवसात दुसरे विजेतेपद –
शेरफान रदरफोर्डला 7 दिवसात दुसरे विजेतेपद मिळाले आहे. त्याने 10 नोव्हेंबरला मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते आणि 17 नोव्हेंबरला पीएसएलचे विजेतेपद जिंकले आहे.
Sherfane Rutherford become IPL and PSL winner within 7 days. pic.twitter.com/2IcYTJM3Nz
— Johns. (@CricCrazyJohns) November 18, 2020
शेरफानने मुंबईकडून यंदा विजेतेपद मिळवले जरी असले तरी त्याला यंदाच्या आयपीएल हंगामात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये अपयश आलेला विराट लागला कसोटीच्या तयारीला, पाहा कसा सुरु केलाय सराव
आयपीएल २०२०चा सुपरस्टार ‘वरुण चक्रवर्ती’ सोशल मीडियावरही ठरला सुपर, एका फोटोने…
“…जेव्हा आम्ही आणि आमच्या मिश्या पातळ असायच्या”, इरफानने युसुफला दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा
ट्रेंडिंग लेख –
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला