गतविजेता फ्रांस संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा सुरू होण्याआधीच पॉल पोग्बा, एनगोलो कांटे, एनकूकू आणि किम्पेबे हे दुखापतीमुळे बाहेर झाले. अशातच करिम बेंझेमा यालाही ट्रेनिंग करताना दुखापत झाली. यामुळे तो 22वा फिफा विश्वचषक सुरू होण्याच्या एक दिवस आधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. फिफा विश्वचषक 2022 रविवारी (20 नोव्हेंबर) सुरू होत आहे. यामध्ये पहिला सामना यजमान कतार विरुद्ध इक्वाडोर यांच्यात खेळला जाणार आहे.
फ्रांसचा स्टार फुटबॉलपटू करिम बेंझेमा (Karim Benzema) यावर्षी चांगल्याच फॉर्ममध्ये होता. त्याने नुकतेच बॅलोन डी’ओर पुरस्कारही जिंकला होता. त्यामुळे 1978 नंतर पहिल्यांदा असे असेल जेव्हा नुकतेच बॅलोन दी ओर जिंकलेला खेळाडू विश्वचषकात खेळणार नाही. या स्पर्धेत फ्रांसचा पहिला सामना 23 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. फिफाच्या नियमानुसार, फ्रांसला त्यांच्या पहिल्या सामन्याच्या 24 तासांआधी बेझेंमाच्या बदली खेळाडूचे नाव सांगावे लागेल.
बेझेंमाने रियल माद्रिदकडून खेळताना मागील हंगामात 44 सामन्यात 46 गोल केले होते. तसेच त्याने 2014 मध्ये विश्वचषक खेळला होता आणि तेव्हा तो फ्रांसकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. त्याला 2016 मध्ये संघातून काढले होते, मात्र 2018च्या विश्वचषकात तो संघाचा भाग नव्हता. तेव्हा फ्रांसने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली होती. तो 2018च्या विश्वचषकानंतर संघात परतला असून त्याने आतापर्यंत 16 सामन्यात 10 गोल केले आहेत.
बेंझेमाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याने पोस्टमध्ये म्हटले, ‘माझ्या आयुष्यात मी कधीही हार मानत नाही पण आज मला संघाचा विचार करायचा आहे जसे मी नेहमी करतो. संघासाठी जो योग्य असेल जो विश्वचषकात उत्तम कामगिरी करेल त्याला जागा देण्यास काही हरकत नाही. मला पाठिंबा दर्शवल्याबद्दल धन्यवाद.’
https://www.instagram.com/p/ClKPtLPrnL7/?utm_source=ig_web_copy_link
बेंझेमा राष्ट्रीय संघात परतल्याने त्याचे चाहते खूप खूश होते, कारण यावर्षी तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. 2021-22चा लालीगा हंगाम संपल्यानंतर त्याने 32 सामन्यात 27 गोल केले ज्यामुळे त्याला पिचिचि ट्रॉफी मिळाली. ही त्याच्या कारकिर्दीतील पहिलीच पिचिची ट्रॉफी होती. तसेच त्याने माद्रिदचा चॅम्पियन्स लीगमधील 1000वा गोलही नोंदवला. त्याने ही कामगिरी शाख्तर डोनेस्तक विरुद्ध ही कामगिरी केली होती. Karim Benzema ruled out after injury FIFA world cup 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीची अपराजित मालिका खंडित; केरला बास्टर्सने दिला पराभवाचा धक्का
ठरलं एकदाचं! खुद्द वडिल सुनील शेट्टीने केले केएल राहुल-आथिया शेट्टीच्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य