औंरंगाबाद| ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत मुलांच्या गटात कर्नाटकच्या सहाव्या मानांकित तनुष घिलदयालने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित पुण्याच्या अर्णव पापरकरचा 6-4, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या अंतिम फेरीच्या लढतीत कर्नाटकच्या बिगर मानांकित एन. हर्षिनी हिने ओरिसाच्या दुस-या मानांकीत सोहनी मोहंतीचा 3-6, 6-2, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मुलींच्या दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत कर्णाटक ऋषिता रेड्डी व ओरीसाच्या सोहिनी मोहंती या दुस-या मानांकीत जोडीने कर्नाटकच्या एन. हर्षिनी व स्निग्धा कांता यांचा संघर्षपुर्ण लढतीत 6-2,6-7(5),10-7 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व 200 एआईटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 150 एआयटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली.तसेच एर्नझल कडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिडकोच्या मुख्य प्रशासक आयएएस दीपा मुधोळ मुंडे, एक्साईज विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदिप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय दत्ता, एड्युरन्सचे रविंद्र खरूड, सरकारी वकिल अमिर काझी, स्पर्धा संचालक वर्षा जैन, नियोजन सचिव आशुतोष मिश्रा, एआयटीए सुपरवायझर वैशाली कन्नमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी- मुले:
तनुष घिलदयाल (6)(कर्नाटक) वि.वि अर्णव पापरकर (5)(महाराष्ट्र) 6-4, 6-4
मुली:
एन. हर्षिनी (कर्नाटक) वि.वि सोहनी मोहंती(2)(ओरिसा) 3-6, 6-2, 6-4
दुहेरी: अंतिम फेरी:मुली:
ऋषिता रेड्डी(तेलंगणा)/ सोहिनी मोहंती(ओरीसा) (2)वि.वि एन. हर्षिनी( कर्नाटक)/ स्निग्धा कांता (कर्नाटक) 6-2,6-7(5),10-7
महत्त्वाच्या बातम्या-
स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत ३० यार्डस् सिनियर संघाची विजयी सलामी
दक्षिण आफ्रिकेत ‘रो’ ‘हिट’ होण्यासाठी सज्ज, पूर्ण केली फिटनेस चाचणी; खेळणार वनडे मालिका!