ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघ भारताच्या (INDvsAUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ते भारताविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेतील पहिला सामना मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरूवात होणार आहे. ही मालिका भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय दिग्गजाने त्याचा संघ निवडला असून त्याने रिषभ पंत आणि आर अश्विन यांना वगळले आहे. त्याचबरोबर दीपक हुड्डा याला देखील अंतिम अकरामध्ये जागा दिली नाही.
भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताचा संघ निवडला असून त्याने सलामीवीर म्हणून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना त्याच्या अंतिम अकरामध्ये स्थान दिले आहे. मधल्या फळीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव याला चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे.
जाफर यांनी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांंच्यापैकी कार्तिकला विकेटकीपर म्हणून अंतिम अकरामध्ये स्थान दिले आहे, असे करताना त्याने पंतला वगळले आहे. संघामध्ये फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांना निवडले आहे. तसेच त्याने तीन वेगवान गोलंदानादेखील संघात जागा दिली आहे. त्यामध्ये हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांंचा समावेश आहे.
हर्षल आणि बुमराह हे दोघेही आशिया चषक 2022 चा भाग नव्हते, मात्र या दोघांनाही टी20 विश्वचषकाच्या संघात घेतले आहे. यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून या दोघांचे अंतिम अकरातील स्थान जवळपास निश्चित आहे.
https://twitter.com/WasimJaffer14/status/1571824083058462721?s=20&t=8Er1aEheUiaXEEFIMxMfWQ
वसीम जाफरची ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची प्लेईंग इलेवन-
केएल राहुल (उपकर्णधार), रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
SA T20 लिलाव: मार्की खेळाडूंत युवा जेन्सन ठरला महागडा; निशाम अनसोल्ड
भारतीय युवा बॉक्सिर्सनी सर्बियातील गोल्डन ग्लोव्ह ऑफ व्होजवोडिना स्पर्धेत जिंकली 19 पदके
सावध राहा! ऑस्ट्रेलिया घेऊन येत आहे जबरदस्त वेगवान गोलंदाज, काढलाय न्यूझीलंडचा घाम