---Advertisement---

‘फ्लॉप शो’मुळे टीम इंडियातून पत्ता कट होणार! इंग्लंड दौऱ्यानंतर या 2 खेळाडूंचा प्रवास संपणार

On: शनिवार, जुलै 26, 2025 2:05 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 7 बाद 544 धावा करत 186 धावांची आघाडी मिळवली आहे. सध्या बेन स्टोक्स 77 आणि लियाम डॉसन 21 धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडची टीम चौथ्या दिवशी देखील फलंदाजी करत आघाडी 250 धावांपर्यंत नेताना दिसत आहे. अशा परिस्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतासाठी हा सामना वाचवणं म्हणजे खरंच एक चमत्कार ठरेल.

मँचेस्टर टेस्ट सामना हरल्यानंतर भारत ही कसोटी मालिका देखील गमावेल. सध्या भारत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. जर इंग्लंड मँचेस्टर सामना जिंकला, तर ते 3-1 अशी विजयी आघाडी मिळवतील. इंग्लंड दौऱ्यात भारतासाठी दोन खेळाडू सर्वात मोठे अपयशी ठरले असून त्यांचं टेस्ट टीममधून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत हे दोन खेळाडू

प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड दौऱ्यानंतर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा भारतीय कसोटी संघातून पत्ता कट होऊ शकतो. लीड्स आणि बर्मिंघम कसोटीमध्ये संधी मिळूनही त्याने अतिशय निराशाजनक कामगिरी केली. दोन्ही सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 6 पेक्षा जास्त होता, जो टेस्ट क्रिकेटसाठी अत्यंत खराब मानला जातो. लीड्समध्ये त्याने 42 षटकांत 220 धावा दिल्या, तर बर्मिंघममध्ये 27 षटकांत 111 धावा दिल्या. या दोन सामन्यांतील चार डावांमध्ये त्याने केवळ 6 विकेट्स घेतल्या.

करुण नायर
8 वर्षांनंतर टेस्ट संघात परतलेला करुण नायर आपली संधी अजिबात साधू शकला नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने 6 डावांत 0, 20, 31, 26, 40 आणि 14 अशी कामगिरी केली. त्यामुळे मँचेस्टर कसोटीपूर्वीच त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की इंग्लंडविरुद्धचा हा दौरा त्याचा शेवटचा कसोटी दौरा ठरेल. करुण नायरने 9 कसोटीमध्ये 42.08 च्या सरासरीने 505 धावा केल्या आहेत, ज्यात नाबाद 303 धावांची ऐतिहासिक खेळी समाविष्ट आहे.

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now
    ---Advertisement---