भारतीय खेळाडू करुण नायर (Karun Nair) बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला आहे. तत्पूर्वी 3 वर्षांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती की, “प्रिय क्रिकेट, कृपया मला आणखी एक संधी द्या.” विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) त्याने शानदार पुनरागमन केले. या देशांतर्गत 50 षटकांच्या स्पर्धेत त्याने खणखणीत 5 शतके झळकावली.
विदर्भासाठी खेळताना, करुण नायरने (Karun Nair) या वर्षी 756च्या आश्चर्यकारक सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची धावांची भूक स्पष्टपणे दिसून येत आहे. 3 वर्षांपूर्वी त्याने क्रिकेटला मागितलेली संधी त्याला पुन्हा मिळाली आहे. तो या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे.
आता करुण नायर (Karun Nair) भारतीय संघात पुनरागमन करण्यावर लक्ष ठेवून आहे. त्याला भारताकडून शेवटचा सामना खेळल्यापासून 8 वर्षे झाली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्याच्या शेवटी होऊ शकते. दरम्यान नायर कोणत्या प्रकारची कामगिरी करत आहे यावर निवड समितीचे लक्ष असेल. त्यामुळे ते नायरला संघात घेतील का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरेल.
नायरला भारतीय संघात स्थान मिळेल अशी आशा करणे अवास्तव नाही. संघाबाहेर राहून बराच काळ गेला असला तरी, त्याने पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. दरम्यान तो म्हणाला, “देशासाठी खेळणे हे नेहमीच एक स्वप्न राहिले आहे आणि माझे हे स्वप्न अजूनही जिवंत आहे. शेवटी, आपण क्रिकेट फक्त आपल्या देशासाठी खेळतो.”
तथापि, नायरची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. त्याने अनेक वेळा जवळच्या संधी गमावल्या आहेत. तो याला त्याचे तिसरे पुनरागमन मानत आहे. यावर तो म्हणाला, “मला वाटतं हे माझं तिसरे पुनरागमन आहे आणि मी सध्या जे करत आहे ते करत राहावे लागेल. मला प्रत्येक सामन्यात धावा करायच्या आहेत, मला शक्य तितके हे करत राहायचे आहे. बाकीच्या गोष्टींवर माझे नियंत्रण नाही.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “माझी निवड होईपर्यंत ते फक्त एक स्वप्न आहे. हे अजून प्रत्यक्षात आलेले नाही. पण, मी म्हटल्याप्रमाणे, मला एका वेळी फक्त एकाच डावावर लक्ष केंद्रित करायचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
“अशाप्रकारे संघाच्या बातम्या लीक होणं थांबेल”, आकाश चोप्रानं सांगितला रामबाण उपाय
रिंकू सिंहचा साखरपुडा झाला? समाजवादी पक्षाच्या खासदार सोशल मीडियावर चर्चेत
किरॉन पोलार्डनं इतिहास रचला! टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच