भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू झालेली आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात करुण नायरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. त्याची टीम इंडियामध्ये बऱ्याच काळानंतर निवड झाली आहे. नायरने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो सतत टीम इंडियापासून दूर जात होता. आता नायरने भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवून विश्वविक्रम केला आहे.
करुण नायरने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये खेळला. तो 8 वर्षांनी टीम इंडियात परतला. टीम इंडियामधून वगळल्यानंतर नायरने एकूण 408 आंतरराष्ट्रीय सामने गमावले. त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने गमावण्याचा विश्वविक्रम केला. याआधी, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने गमावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या रियाद अमृतच्या नावावर होता. 2007 ते 2018 पर्यंत त्याने वेस्ट इंडिजसाठी एकूण 396 आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत. पण आता नायर या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
पहिल्या दिवशी नायरला फलंदाजीची संधी मिळाली नाही. कारण भारतीय टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी कमाल केली. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने शतक झळकावले. त्याने 159 चेंडूत 101 धावा केल्या. याशिवाय कर्णधार शुबमन गिलनेही पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरपर्यंत नाबाद शतक झळकावले. रिषभ पंतनेही पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरपर्यंत अर्धशतकासह नाबाद होता. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. 92 षटकांनंतर भारतीय संघाची धावसंख्या 380/3 आहे.






