यावर्षी एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. सीएसकेच्या विजयात नक्कीच कर्णधार एमएस धोनी याचे योगदान महत्वाचे राहिले. संपूर्ण हंगामात दोनी आपल्या गुडघ्याच्या दुखापतीशी संघर्ष करताना दिसला. पण सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण हंगामात धोनीने एकदाही दुखपातीविषयी तक्रार केली नाही.
आयपीएल 2023 हंगामापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात सीएसकेने चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या होत्या. यावर्षी त्याच्याच नेतृत्वात संघाने पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि मुंबई इंडियन्सची बरोबरी देखील केली. या विजयासोबतच धोनी आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार देखील ठरला. आयपीएल हंगामादरम्यान धोनी ज्या गुडघ्याच्या दुखापतीशी झगडत होता, त्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पाडली. सथ्या तो दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाकथतीत काशी विश्वनाथ () म्हणाले की, “आम्ही त्याला कधीच विचारलं नाही की, त्याला खेळायचं आहे की नाही? जर त्याला खेळायला जमणार नसेल, तर तो आम्हाला म्हटला अशता. आम्हाला समजत होते की, त्याला खेळताना अडचण येत आहे. पण संघासाठी त्याचे वचनबद्ध असणे आणि त्याचे नेतृत्व संघासाठी किती फायदेशीर असते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर यासाठी त्याचे कौतुक झालेच पाहिजे.”
“अंतिम सामन्यापर्यंत त्याने आपल्या गुडघ्याच्या दुखापतीविषयी कुणाजवळ तक्रार केली नव्हती. पण ही गोष्ट सर्वांना माहिती होती. तुम्हीही त्याला धावताना पाहिले असेलच. पण त्याने एकदाही तक्रार केली नाही. अंतिम सामन्यानंतर तो म्हणाला, ‘ठीक आहे, माझी एक शस्त्रक्रिया होईल.’ त्याने ही शस्त्रक्रिया करून घेतली आहे. सध्या तो आनंदात आहे आणि दुखापतीतून रावरत देखील आहे,” असेही सीएसकेच्या सीईओंनी पुढे सांगितले. (Kashi Vishwanath’s big revelation about MS Dhoni’s injury in IPL 2023)
महत्वाच्या बातम्या –
‘दादा’ची जमीन बळकावण्याचा प्रयत्न! फोनवरून मिळाली धमकी, प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना डिवचणे ‘बार्मी आर्मी’ला पडले महागात! वॉर्नरने ‘विराट स्टाईल’ने केली बोलती बंद!