टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील सामन्यांना शनिवारी सुरूवात झाली. रविवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने होते. तुल्यबळ लढतीची अपेक्षा असताना पाकिस्तान संघाने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताचा १० गडी राखून पराभव करत पहिला विजय मिळवला. या पराभवानंतर भारतातील काही ठिकाणी अनेक वादग्रस्त घटनादेखील घडल्या. अशीच एक घटना पंजाब येथे घडली. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अशी घडली घटना
पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतात काही ठिकाणी वादग्रस्त घटना घडल्या. दिल्ली येथे काही लोकांनी फटाके फोडल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्याच वेळी पंजाब येथील संगरुरच्या गुरुदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारच्या काही तरुणांनी काश्मीरच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली.
https://twitter.com/aarifshaah/status/1452468399481626624
मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मते,
“आम्ही आमच्या रूममध्ये हा सामना पाहत बसलेलो. त्याच वेळी उत्तर प्रदेश आणि बिहार येथे काही विद्यार्थी आमच्या रूममध्ये घुसले व त्यांनी आम्हाला मारहाण केली. पंजाबच्या काही स्थानिक विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत आम्हाला जास्त मारहाण होण्यापासून वाचवले.”
या घटनेनंतर देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच अनेकांनी काश्मीरच्या तरुणांना पाठिंबा दर्शवला आहे.
पहिल्याच सामन्यात भारताचा दारुण पराभव
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा व केएल राहुल हे दोन्ही सलामीवीर अनुक्रमे ० व ३ धावा काढून माघारी परतले. विराट कोहलीच्या ५७ व रिषभ पंतच्या ३९ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांच्या अखेरीस १५१ भावा उभारल्या. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी नाबाद अर्धशतके झळकावत पाकिस्तानला १८ षटकांमध्ये १० गड्यांनी सामना जिंकून दिला. तीन बळी मिळवणारा शाहीन आफ्रिदी सामनावीर ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
तो पुन्हा आला! ‘मुझे मारो’ वाल्या पाकिस्तानी चाहत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल