१९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत युएईत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम खेळला जाणार आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीत व्यस्त असताना १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण, तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून क्रिकेट खेळताना न दिसलेल्या धोनीला आयपीएलमध्ये पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अशात चेन्नई सुपर किंग्स संघाचे सीइओ कासी विश्वनाथन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “धोनी जेव्हापर्यंत वाटेल तेव्हापर्यंत चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)कडून खेळू शकतो. जरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणार आहे.”
“आमच्या योजनेनुसार धोनी २०२१पर्यंत आमच्या संघाकडून खेळेल. अपेक्षा आहे की, तो चेन्नईकडून खेळणे चालू ठेवेल. आम्ही धोनीच्या क्रिकेटशी संबंधित निर्णयांमध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. त्याने सीएसकेला लवकर सोडू नये,” असे पुढे बोलताना विश्वनाथन म्हणाले.
काही दिवसांपुर्वी चेन्नईमध्ये सीएसकेच्या सराव शिबिरात सहभागी झालेला धोनी अशाप्रकारे त्याची निवृत्ती जाहीर करेल, याचा कोणालाही अंदाज नव्हता. याविषयी बोलताना विश्वनाथन म्हणाले की, “कुणालाही माहिती नव्हते की धोनी निवृत्ती घेणार आहे. पहिल्या सराव शिबिरादरम्यान त्याने निवृत्तीची माहिती एन श्रीनिवासन यांना दिली होती. धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयाने सर्वजण चकित झाले. पण धोनीने त्याच्या भावना व्यक्त केल्या नाहीत. तो नेहमीप्रमाणे शांत होता. धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेने गेल्या काही वर्षांत खूप नाव कमावले आहे. यंदाही तो त्याच्यातील क्षमतेंनी आम्हाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरेल.”
धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेला आतापर्यंत तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. सीएसके हा आयपीएलमधील दूसरा सर्वात यशस्वी संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्ध टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघ सज्ज; या १४ खेळांडूंची झाली संघात निवड
‘कोण माझी पहिली कार मला परत आणून देईल का?’ मास्टर ब्लास्टर करतोय विनवणी
२०११ विश्वचषकातील धोनीचा विजयी षटकार ज्या ठिकाणी पडला होता, ती सीट होणार धोनीच्या नावावर?
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या फायनलमध्ये ‘या’ धडाकेबाज खेळाडूने ठोकलेत सर्वाधिक षटकार; धोनी आहे ‘या’ क्रमांकावर
धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा