भारतीय संघासाठी तिहेरी शतक करणाऱ्या करुण नायर याने मोठा निर्णय रविवारी (27 ऑगस्ट) घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या दोन दशकांमध्ये करुण नायर कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र आघामी हंगामात त्याने कर्नाटकसाठी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामात विदर्भ संघाकडून खेळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला.
करुण नायर (Kaun Nair) याने भारतीय संघासाठी 2016 मध्ये पदार्पण केल होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला पहिल्यांदा संधी दिली गेली होती. त्यानंतर याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याला पहिल्यांदा भारताच्या कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 6 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याची सरासरी 62.33, तर वनडे क्रिकेटमध्ये 23 राहील आहे. असे असले तरी, त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2017 मध्ये खेळला आहे. त्यानंतर अद्याप त्याला भारतीय संघात निवडले गेले नाहीये. देशांतर्गत क्रिकेटच्या सुरुवात होण्याआधी रविवारी त्याने विदर्भासाठी खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वांना सांगितले.
करुन नायर याने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट करत करूण नायरने ही माहिती चाहत्यांना दिली. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “मागच्या दोन दशकांपासून कर्नाटक राज्य क्रिकेट बोर्डासोबत केलेला प्रवास अतुलनीय आहे. यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांमध्ये कर्नाटक क्रिकेट बोर्डाने माझी वाट प्रकाशमय केली. आज मी जो एक खेळाडू म्हणून उभा आहे, त्यासाठी या संघाची खूप मदत झाली आहे.”
“विदर्भ क्रिकेट असोसिएसोबत नवीन अध्यायाची सुरुवात करताना मी आपल्यासोबत कर्नाटक संघाकडून मिळालेल्या प्रेमळ आठवणी, मैत्री आणि कौशल्य घेऊन जात आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा अविभाज्या भाग बनल्याबद्दल धन्यवाद. आता पुढेही साहसी प्रवास करायचा आहे.”
https://www.instagram.com/p/CwcRZc6hEhE/?igshid=NzZhOTFlYzFmZQ==
31 वर्षीय करुण नायरचे देशांतर्गत क्रिकेटमधील आकडे पाहिले, तर उजखुऱ्या फलंदाजची कारकीर्द चांगली राहिली आहे. करुणने 85 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 48.94 च्या सरासरीने 5922 धावा केल्या आहेत. कसोटी प्रमाणे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तिहेरी शतक केले आहे. लीस्ट ए क्रिकेटमधील 90 सामन्यांमध्ये त्याला 2119 धावा करता आल्या. यादरम्यान त्याची सरासरी 30.71 राहिली. देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 150 सामन्यांमध्ये दोन शतकांच्या मदतीने 2989 धावा केल्या आहेत. (Kaun Nair has parted ways with Karnataka and will be representing Vidarbha in the upcoming domestic season)
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशच्या खेळाडूबाबत धक्कादायक ब्रेकिंग! स्टार फलंदाज नाही घेणार श्रीलंकेसाठी भरारी, पण का?
हेडनने निवडली वर्ल्डकपसाठी टीम इंडिया! सॅमसनला संधी तर, हुकमी एक्का केला बाहेर