वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा (Under 19 World Cup) अंतिम सामना अँटिग्वा येथे भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात (U19 World Cup Final) सुरू झाला आहे. सामन्यापूर्वी इंग्लंड संघाचा कर्णधार टॉम प्रेस्टने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना लाजवाब गोलंदाजीचे प्रदर्शन करत इंग्लंड संघाला ४४.५ षटकात १८९ धावांवर सर्वबाद केले. त्याचवेळी इंग्लंड संघासाठी सर्वाधिक धावांचे योगदान देणाऱ्या जेम्स रिव याला बाद करताना भारताचा अष्टपैलू कौशल तांबे याने एक लाजवाब झेल टिपला.
कौशलने टिपला लाजवाब झेल
इंग्लंडची सुरुवात खराब झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज जेम्स रिव व जेम्स सिल्स यांनी ९३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येकडे नेले. संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणारा रिव आपल्या शतकाकडे आगेकूच करत होता. मात्र, इंग्लंडच्या डावातील ४४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रिव षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता त्याने उंचावरून काऊ कॉर्नरकडे मारलेला फटका क्षेत्ररक्षण करत असलेल्या कौशल तांबे याने अप्रतिम पद्धतीने टिपला. पहिल्या प्रयत्नात जर टिपण्यात अपयश आल्यानंतर त्याने सुटलेला चेंडू पुढे झेप घेत झेलला. यासह रिवचे अंतिम सामन्यातील शतक केवळ ५ धावांनी हुकले. मात्र, या झेलासाठी कौशलचे कौतुक होत आहे.
https://twitter.com/UpdateCricket_/status/1489999813122793476?t=-jLjxR569VNwmoSoMK4Otg&s=19
भारतीय संघाने इंग्लंडला रोखले
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. रवी कुमार व राज बावा या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला त्रस्त केले. या दोन्ही गोलंदाजांनी ६१ धावांवर इंग्लंडचे सहा गडी बाद केले होते. मात्र, रिव व सिल्स यांनी आठव्या गड्यासाठी ९३ आहे धावांची भागीदारी केली. रिव बाद झाल्यानंतर अवघ्या सहा धावांमध्ये इंग्लंडचा डाव आटोपला. जेम्स रिवने ९५ धावांची खेळी करत इंग्लंडला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली.
महत्वाच्या बातम्या-
विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती (mahasports.in)
U19 WC FINAL| नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने; प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय (mahasports.in)