---Advertisement---

अखेर कळी खुलली! शानदार विजयानंतर काव्या मारन झाली भलतीच खुश; पाहा फोटो

On: मंगळवार, सप्टेंबर 28, 2021 10:27 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.असाच एक रोमांचक सामना सोमवारी (२७ सप्टेंबर) पाहायला मिळाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. जेसन रॉयच्या तुफानी खेळीमुळे हे आव्हान सनरायझर्स हैदराबाद संघाने यशस्वीरित्या पूर्ण करत जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर राजस्थान रॉयल्स संघाचे समर्थक नाराज झाले होते. तर सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात उत्साहाचे वातावरण होते.

सनरायझर्स हैदराबाद संघाची संघमालक व मुख्य कार्यकारी अधिकारी काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना झाल्यानंतर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक सामन्यानंतर तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील तिने स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. तसेच सामना झाल्यानंतर तिचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

काव्याची खुलली कळी

आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. १० सामन्यांपैकी अवघ्या २ सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. ज्यामुळे हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाला आहे. आपल्या संघाला चीयर करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाची संघमालक काव्या मारन ही प्रत्येक सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असते. परंतु, गेल्या काही सामन्यात संघ पराभूत झाल्यामुळे ती निराश झाली होती.दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केल्यानंतर काव्या मारनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती स्टँडमधून खेळाडूंचे टाळ्या वाजवून कौतुक करत होती.

https://twitter.com/GSMadhanoffl/status/1442554928975663110?s=19

राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने तुफान फटकेबाजी करत ८२ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ३६ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला ५ बाद १६४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर केन विलियमसनने नाबाद ५१ धावांची खेळी करून सनरायझर्स हैदराबाद संघाला हा सामना ९ चेंडूं शिल्लक असताना ७ गडी राखून जिंकून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---