त्याच्या या निवडीबद्दल बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, ‘केदारने त्याचा फिटनेस सिद्ध केला आहे. त्यामुळे त्याचा विंडीज विरुद्ध चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी समावेश करण्यात आला आहे.’
केदारचा गुरुवारी(25 आॅक्टोबर) विंडीज विरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल केदारने आश्चर्यही व्यक्त केले होते.
केदारच्या या निवडीबद्दल निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले की ‘तो दुखापतीतून परत येत आहे. त्यामुळे आम्ही त्याला देवधर ट्रॉफी खेळण्यास सांगितले होते. आम्हाला अपेक्षा होती की त्यांचा संघ अंतिम सामन्यात जाईल म्हणून आम्ही केदारचा तिसऱ्या वनडेसाठी भारतीय समावेश केला नव्हता. पण त्याला चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.’
यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (इंडीयन प्रीमियर लीग) चेन्नई सुपर किंगकडून खेळणाऱ्या जाधवला सुरूवातीलाच हॅमस्ट्रींगची दुखापत झाल्याने संपुर्ण मोसमाला मुकावे लागले होते. तसेच नुकत्याच झालेल्या एशिया कपमध्ये या 33 वर्षीय खेळाडूला अंतिम सामन्यात फलंदाजी करताना हॅमस्ट्रींगचा त्रास होत होता.
या दुखापतीमुळे त्याला विंडीज विरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांनाही मुकावे लागले होते. त्यामुळे तो सध्या सुरु असलेल्या देवधर ट्रॉफीमध्ये भारत अ संघाकडून खेळला.
तसेच जेव्हा विंडीज विरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा तो भारत अ संघाकडून भारत क संघाविरुद्ध सामना खेळत होता. या सामन्यात त्याने 25 चेंडूत नाबाद 41 धावा करत त्याचा फिटनेस चांगला असून तो दुखापतीतून सावरला असल्याचे त्याने दाखवून दिले होते आणि निवड समितीचे लक्ष वेधले होते.
UPDATE – @JadhavKedar has been included in #TeamIndia squad for the 4th and 5th ODI against Windies.#INDvWI
— BCCI (@BCCI) October 26, 2018
अशी आहे तिसऱ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव. युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, केएल राहुल, मनीष पांडे
अशी आहे चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव. युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव.
महत्त्वाच्या बातम्या:
–निवड समितीने दाखवला धोनीला घरचा रस्ता, टीम इंडियातून पहिल्यांदाच वगळले
–Video: एकच ग्लोव्हज घालून फलंदाजीला आला हा फलंदाज; पुढे काय झाले ते पहाच