सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या साथीच्या आजाराची लाट आली आहे. या आजारामुळे सर्व सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले दिसून येते. या काहीशा जीवघेण्या आजारावर अजूनही ठोस औषधे उपलब्ध नसली तरी, लसीकरणाच्या माध्यमातून लोकांना आजारापासून दूर ठेवण्याचा प्रतिबंधात्मक उपाय अवलंबला जात आहे. भारतात सरकार, प्रशासन तसेच सेलिब्रिटी लोकांना लस घेण्याचे आवाहन करत आहेत. क्रिकेटपटू केदार जाधव याने नुकतेच आपले लसीकरण करून घेतले.
केदारने लसीकरणाचे छायाचित्र इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादमध्ये त्याचा संघ सहकारी असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने प्रतिक्रिया दिली.
— IamKedar (@JadhavKedar) June 29, 2021
केदारने घेतली कोरोना प्रतिबंधक लस
अष्टपैलू केदार जाधव सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर आहे. इंग्लंड तसेच श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येतोय. या काळातच त्याने आपले कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले.
त्याने ट्विटरवर छायाचित्र पोस्ट केल्यानंतर, तो आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून त्याचे हे छायाचित्र शेअर केले. या छायाचित्राला ‘दिवसातील सर्वोत्तम फटका दिला जातोय…’ अशा आशयाचे कॅप्शन दिले. सोबतच गेट वॅक्सिनेटेड हा हॅशटॅग देखील वापरण्यात आला आहे.
वॉर्नरने दिली अशी प्रतिक्रिया
केदार जाधवच्या या छायाचित्रावर त्याचा सनरायझर्स हैदराबाद संघातील सहकारी डेव्हिड वॉर्नर त्याने उत्तर देताना लिहिले,
‘चांगलं काम केलस भावा, सर्वजण सुरक्षित रहा. मीदेखील माझे दोन्ही डोस घेतले आहेत.’
केदार जाधव प्रथमच सनरायझर्स हैदराबादसाठी खेळत आहे. तर, मागील सहा वर्षांपासून सनरायझर्सचा कर्णधार असलेल्या वॉर्नरला आयपीएल २०२१ च्या पहिल्या सहा सामन्यानंतर कर्णधार पदावरून हटविण्यात आले होते. कोरोनामूळे हा हंगाम अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून युएई येथे खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्सने खेळलेल्या सात सामन्यांपैकीत्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला असून ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता? केवळ १० चेंडूत संपला होता ‘तो’ कसोटी सामना, कारण होते विचित्रच
वा बेटा कमाल केलीस! भारताचा अभिमन्यू बनला बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर, केला ‘हा’ विश्वविक्रम
“युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता”, माजी पाकिस्तानी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा