उद्यापासून(7 मे) आयपीएल 2019 च्या प्लेऑफमधील सामन्यांना सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवला रविवारी(5 मे) किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळताना खांद्याची दुखापत झाली आहे.
या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब चेन्नईने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 14 व्या षटकात क्षेत्रकरक्षण करत असलेल्या केदारला चौकार जाण्यापासून चेंडू अडवताना खांद्याची दुखापत झाली. त्यामुळे लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले पण तो नंतर ड्रेसिंगरुममध्ये परतला आणि त्यानंतर मैदानावर आला नाही.
त्याच्या दुखापतीबद्दल चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘त्याचा एक्स-रे उद्या(सोमवारी) काढण्यात येईल. मला वाटत नाही की आम्ही त्याला या मोसमात पुन्हा आमच्या संघाकडून खेळताना पाहू शकतो.’
‘त्याच्यावर विश्वचषकामुळे सर्वांचे लक्ष असेल. त्याला अस्वस्थता वाटत आहे पण आम्हाला त्याची उद्या तपासणी करावी लागेल. आशा आहे की त्याची दुखापत गंभीर नसावी.’
केदारचा 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे केदार विश्वचषकाआधी फिट व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असेल. काही रिपोर्टप्रमाणे त्याला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी 2 आठवड्यांची गरज लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१९ प्लेऑफबद्दल सर्वकाही…
–दोन्ही सलामीवीरांनी एकाच वनडेत केल्या तब्बल १७० पेक्षा अधिक धावा, रचला विश्वविक्रम
–फाफ डु प्लेसिसचे पहिले आयपीएल शतक हुकले केवळ ४ धावांनी, पहा व्हि़डिओ





