आजपासून वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि आयर्लंड संघात तिरंगी वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना डब्लिन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड संघात सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शाय होप आणि जॉन कॅम्पबेल यांनी 365 धावांची सलामी भागीदारी रचत विश्वविक्रम रचला आहे.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय चूकीचा ठरवत होप आणि कॅम्पबेल यांनी 47 व्या षटकापर्यंत एकही विकेट जाऊ दिली नाही. या दोघांनी 47.2 षटकात 365 धावांची भागीदारी रचली. अखेर कॅम्पबेलला मॅककार्थीने बाद करत ही जोडी फोडली.
पण या जोडीने वनडे क्रिकेटमध्ये(पुरुष आणि महिला मिळून) सर्वोत्तम सलामी भागीदारी करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी हा पराक्रम करताना पुनम राऊत आणि दिप्ती शर्मा या भारतीय महिला जो़डीचा विश्वविक्रम मोडला आहे. पुनम आणि दिप्तीने 2017 मध्ये आयर्लंड महिला संघाविरुद्ध 320 धावांची सलामी भागीदारी रचली होती.
पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये होप आणि कॅम्पबेल यांनी इमाम-उल-हक आणि फकार जमान या जोडीला मागे टाकले आहे. इमाम आणि फकार यांनी 2018 ला झिम्बाब्वे विरुद्ध 304 धावांची सलामीला भागीदारी रचली होती.
मात्र होप आणि कॅम्पबेलचा वनडेमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी रचण्याचा विश्वविक्रम केवळ 8 धावांनी हुकला. हा विश्वविक्रम ख्रिस गेल आणि मार्लिन सॅम्यूएल्स यांच्या नावावर आहे. त्यांनी 2015 ला झिम्बाब्वे विरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 372 धावांची भागीदारी केली होती.
आजच्या सामन्यात होपने 152 चेंडूत 170 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 22 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच कॅम्पबेलने 137 चेंडूत 15 चौकार आणि 6 षटकारांची बरसात करत 179 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे वनडे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी 170 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या सामन्यात या दोघांनी केलेल्या दिडशतकी खेळींच्या जोरावर वेस्टइंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 बाद 381 धावा करत आयर्लंडला विजयासाठी 382 धावांचे आव्हान दिले आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सलामी भागीदारी (पुरुष आणि महिला मिळून) –
365 धावा – शाय होप आणि जॉन कॅम्पबेल (विरुद्ध आयर्लंड, 2019)
320 धावा – पुनम राऊत आणि दिप्ती शर्मा (विरुद्ध आयर्लंड, 2017)
304 धावा – इमाम-उल-हक आणि फकार जामन (विरुद्ध झिम्बाब्वे, 2018)
286 धावा – सनथ जयसुर्या आणि उपुल थरंगा (विरुद्ध इंग्लंड, 2006)
284 धावा – ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध पाकिस्तान, 2017)
WHAT. A. PARTNERSHIP. ????
John Campbell and Shai Hope have smashed the world record for the highest ODI stand, falling just eight runs shy of breaking the record for any wicket. ????
Absolutely incredible! ????#IREvWI pic.twitter.com/paPdsvC2Zt
— ICC (@ICC) May 5, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–फाफ डु प्लेसिसचे पहिले आयपीएल शतक हुकले केवळ ४ धावांनी, पहा व्हि़डिओ
–एमएस धोनीनंतर आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा विराट कोहली दुसरा कर्णधार






