नवी दिल्ली। इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला मॅनचेस्टर येथे कालपासून (२४ जुलै) सुरुवात झाली. पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज केमर रोचला चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात त्याने शानदार पुनरागमन केले. त्याने आपल्या पहिल्याच षटकात इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज डॉम सिब्लेला पायचीत केले आणि शून्य धावेवर पव्हेलियनचा रस्ता दाखविला. यानंतर त्याने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला त्रिफळाचीत केले.
रोचने घेतलेली स्टोक्सची विकेट उल्लेखनीय ठरली. त्यावेळी स्टोक्स २० धावांवर खेळत होता. त्याचा हा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने (Jason Holder) नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. ५० धावांच्या आतच संघाच्या २ विकेट्स पडल्या. यामध्ये कर्णधार जो रूटलाही (Joe Root) चांगली कामगिरी करता आली नाही. तोदेखील १७ धावा करत बाद झाला.
Big wicket for the tourists.
Scorecard/Clips: https://t.co/pvF724ZqtE#ENGvWI #RedForRuth pic.twitter.com/mWTz67aOQI
— England Cricket (@englandcricket) July 24, 2020
मालिकेतील पहिल्या २ सामन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने १-१ने बरोबरी साधली आहे. पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजने ६ विकेट्सने जिंकला, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्सच्या धडाकेबाज खेळीमुळे इंग्लंडने मालिकेत पुनरागमन केेले. स्टोक्सने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे १७६ आणि ७८ धावांची खेळी केली होती.
वेस्ट इंडिजला ३२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी तिसरा कसोटी सामना जिंकावा लागेल, तर इंग्लंडचा संघ तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. आता हा निर्णायक कसोटी सामना कोण जिंकेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कसोटीत सर्वात जलद द्विशतक करणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज
-झाले असते दिग्गज क्रिकेटर, परंतू त्याआधीच संपली क्रिकेटर कारकिर्द
-या ३ भारतीय महिला क्रिकेटर, ज्यांचे वनडे द्विशतक हुकले थोडक्यात