टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्र्लियाने न्यूझीलंडला ८ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केन विलियम्सनच्या दमदार खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी केली होती, पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीही तुफान फटकेबाजी केली आणि सामन्यात विजय मिळवला. विलियम्सनने या सामन्यात न्यूझीलंडसाठी ४८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८५ धावा केल्या. यादरम्यान विलियम्सनने एक षटकार असा मारला, जो पाहून सर्वाना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची आठवण आली असावी.
कर्णधार विलियम्सनने अंतिम सामन्यपूर्वीच्या ९ डावांमध्ये अवघ्या १३.७८ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेहटही फक्त १०४.२० चा होता. मात्र अंतिम सामन्यात त्याने संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने न्यूझीलंडच्या डावादरम्यान भारताच्या रिषभ पंतप्रमाणे एका हाताने षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
त्याने हा षटकार न्यूझीलंडच्या डावाच्या १३ व्या षटकात मारला, ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. विलियम्सनने हा षटकार मिडविकेटच्या वरून मरला. त्याच्या या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विलियम्सन या सामन्यात न्यूझीलंडसाठी सर्वाधित धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तसेच टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाजही ठरला आहे. त्याने या सामन्यात ३२ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. विलियम्सनव्यतिरिक्त न्यूझीलंडचा एकही फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1459901255053201413?s=20
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या होत्या. यामध्ये मार्टिन गप्टिलने २८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य १८.५ षटकात गाठले. ऑस्ट्रेलियासाठी मिशेल मार्शने सर्वाधिक ७७ धावांची नाबाद खेळी केली. यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. तसेच सलामीवीर डेविड वार्नरने (५३) त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि तो टी२० विश्वचषकात मालिकावीर ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पती वॉर्नरला कमी लेखणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची कँडिसने चांगलीच जिरवली, ‘अशा’ शब्दांत फटकारले
ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणाऱ्या वॉर्नरला मालिकावीर निवडल्याने भडकला अख्तर; म्हणाला, ‘आझम खरा…’