विश्वविजेत्या भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखत कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात केनियाचा 50-15 असा धुव्वा उडवला.
मंगळवार दि. 26 जून रोजी कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात बलाढ्य भारताने केनियाचा एकतर्फी पराभव केला.
या विजयासह संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली.
सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटात ऑल आउट झालेल्या केनियाला त्यांच्या गुणांचे खाते उघडायला तब्बल सात मिनिटे लागली.
संपूर्ण सामन्यात भारतीय संघासमोेर केनियाचा निभाव लागला नाही.
भारतीय संघाने या सामन्यात या स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळेलेल्या राजू लाल चौधरी आणि मंजीत चिल्लर यांना संधी दिली होती.
या सामन्याची अडखळत सुरूवात करणाऱ्या केनिया विरुद्ध भारतीय संघ ठराविक अंतराने गुण घेत राहिला.
सामन्याच्या सुरुवातीपासून पिछाडीवर राहिलेल्या केनियाला भारताने सामन्यामध्ये पुन्हा परतण्याची एकही संधी दिली नाही.
भारतीय संघ ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघासोबत शुक्रवार दि. 29 जून रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-








