कोची। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी केरला ब्लास्टर्स आणि बेंगळूरु एफसी यांच्यात लढत होत आहे. ह्या लढतीत दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील.
दोन्ही संघांचे पाठीराखे अगदी कट्टर आहेत. त्यांच्यात सुद्धा एक लढत रंगत असते. ब्लास्टर्स घरच्या मैदानावर निर्धाराने खेळ करण्याची अपेक्षा आहे.
एल्को शत्तोरी प्रशिक्षक असलेल्या ब्लास्टर्सचे आव्हान संपले आहे. हा संघ आठव्या स्थानावर आहे. यानंतरही दक्षिणेतील कडव्या प्रतिस्पर्धी संघाला शह देण्यासाठी ते खेळतील. त्यांना मागील लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेड विरूद्ध गोलशून्य बरोबरी साधावी लागली. त्यांना गेल्या तीन सामन्यात विजय मिळालेला नाही.
यंदा अनेक बाबी ब्लास्टर्स संघासाठी अनुकूल ठरलेल्या नाहीत. प्रामुख्याने बचाव फळीकडून चुका झाल्या. त्यामुळे काही पराभव पत्करावे लागले. त्यांची आघाडी फळी मात्र चांगली चालली आहे. बर्थोलोम्यू ओगबेचे आणि रॅफेल मेस्सी बौली अशा खेळाडूंनी आक्रमणाची धुरा पेलली आहे.
हे दोघे गोलांचा धडाका लावत असताना इतर सहकारी मात्र त्यांना तोलामोलाची साथ देऊ शकले नाहीत. संघाच्या 23 पैकी 18 गोल ह्या दोघांचे आहेत. यंदा केवळ नऊ गोल पत्करलेल्या बेंगळूरु विरूद्ध मात्र त्यांची कसोटी लागेल.
कोची मधील ह्या संघाला मध्य फळीत कल्पक खेळ दाखवता आलेला नाही. साहल अब्दुल समद याला बदली खेळाडू करावे लागेल आहे, तर सर्जिओ सिदोंचा हा तर काहीच पराभव पाडू शकलेला नाही.
शात्तोरी यांनी सांगितले की, बेंगळूरु हा संघ प्रमुख क्लब मध्ये आहे आणि ती त्यांची ताकद आहे. त्यांचे स्वरूप उत्तम दिसते आणि त्यांना फॉर्म्युला गवसला आहे असे म्हणावे लागेल. त्यांचे मनोधैर्य भक्कम आहे.
बेंगळूरु संघाला मागील लढतीत चेन्नईयीन विरूद्ध गोलशून्य बरोबरी पत्करावी लागली. बेंगळूरु संघाचे बाद फेरीतील स्थान मात्र यापूर्वीच नक्की झाले आहे.
बेंगळूरु प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. आम्ही बाद फेरीतील प्रवेश नक्की केला हे चांगले आहे. मोसमापूर्वी आम्ही तसे ध्येय ठेवले होते.