मुंबई । मागील आठवडयात केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननस मध्ये स्फोटक पदार्थ घालून खायला दिल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. माणुसकीचा अंत झाल्याच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या. आता पुन्हा केरळमध्ये एका महिलेवर तिच्या मुलासमोर बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा चांगलाच संतापला असून त्याने ट्विटरवर माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे एका पुरुषाने 25 वर्षीय महिलेला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर त्यांच्या चार मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेवेळी त्या महिलेचा पाच वर्षाचा मुलगा देखील तेथे होता. बलात्कारानंतर महिलेला सिगारेटचे चटके देण्यात आले. मुलाला देखील मारहाण केली. आकाश चोप्राने ही बातमी शेअर करताना ट्विटमध्ये लिहिले की, “देवाचा देश म्हणून ओळखला जाणारा केरळ पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. मानवता संपत चालली आहे.”
God’s own country is in news for all the wrong reasons…. humans can be quite inhuman. https://t.co/CTmXDoaQiu
— Aakash Chopra (@cricketaakash) June 5, 2020
याबाबत अधिक माहिती अशी की, “महिलेच्या पतीने तिला आणि तिच्या मुलांना चार जून रोजी एक पुथुकुरिची येथील बीचजवळ घेऊन गेला. त्यानंतर त्याने आपल्या मित्राच्या घरी सगळ्यांना घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने दारू पाजले. पुन्हा पतीच्या मित्रांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.” या घटनेनंतर देशभर पुन्हा संताप व्यक्त करण्यात येत आहे.