कोलंबो | सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट मैदानावर शुक्रवारपासून (२० जुलै) श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे.
या सामन्यात दक्षिण अाफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महारजने श्रीलंकन भूमीवर अनोखा पराक्रम केला आहे.
केशव महाराजने या कसोटी सामन्यात श्रीलंकेचेच्या पहिल्या डावात 9 फलंदाज बाद करत विक्रम केला.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून ह्यूज टॅफील्ड कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम केला होता. ह्यूज टॅफील्ड यांनी 1957 साली इंग्लंड विरुद्ध 9 बळी मिळवले होते.
केशव महाराजने या कामगिरीमुळे तब्बल 61 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज ह्यूज टॅफील्ड यांची बरोबरी केली.
तसेच या सामन्यात भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा कसोटी सामन्याच्या एका डावात 10 बळी मिळवण्याचा विक्रम थोडक्यात वाचला आहे.
अनिल कुंबळेने 1999 साली पाकिस्तान विरुद्ध दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर एका डावात 10 बळी घेण्याचा विश्वविक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लंडला पराभूत करण्यासाठी आर. अश्विन आतुर
-अर्जुन तेंडुलकरची सुटका नाही, नेटकऱ्यांनी धरले पुन्हा एकदा धारेवर