इंग्लंड आणि न्यूझीलंड २ जूनपासून यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. ही मालिका झाल्यानंतर इंग्लंड संघ भारतीय संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने-सामने येणार आहे. या मालिकेत इंग्लंड संघाकडे भारतीय संघाने या वर्षाच्या सुरवातीला केलेल्या पराभवाची परतफेड करण्याची उत्तम संधी असणार आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघावर ३-१ ने विजय मिळवला होता. अशातच इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने इंग्लंड संघातील खेळाडूंना सल्ला दिला आहे.
त्याने बेटवे डॉट कॉमच्या एका स्तंभात लिहिले की, “आतापर्यंत इंग्लंड संघाला असा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शोधण्यात यश आले नाही, जो गोलंदाज फलंदाजी ही करेल. इंग्लंड संघाला कुठल्याही परिस्थितीत आपला रवींद्र जडेजा शोधण्याची गरज आहे. जडेजाने भारतीय संघासाठी कसोटी, वनडे आणि टी -२० मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. ही एक मोठी समस्या आहे, ज्यावर लवकरच इंग्लंड संघाला तोडगा काढावा लागेल. कारण जडेजासारखा खेळाडू इंग्लंड संघाला मिळाला तर त्यापेक्षा अनमोल काहीच नसेल.”
युवा खेळाडूंना दिला सल्ला
तसेच पीटरसनने युवा खेळाडूंना सल्ला देत लिहिले की,”रवींद्र जडेजाची नक्कल करा, कारण तो एक स्टार खेळाडू आहे. जर तुम्ही असं करण्यात यशस्वी ठरले तर, कसोटी क्रिकेटमध्ये तुमची कारकीर्द आणखी मोठी होईल.”
जॅक लीच बद्दल बोलताना केविन पीटरसन म्हणाला…
तसेच पीटरसनने पुढे लिहिले की, “मी दोन वर्षापूर्वीच म्हटले होते की, लीच सामना जिंकवणारा खेळाडू होऊच शकत नाही. दुर्देवाने हेच खरे झाले. तो इंग्लंड संघाला कसोटी सामना जिंकून देऊ शकत नाही.तो माँटी पानेसर आणि ग्रॅमी स्वान सारखा गोलंदाज नाही. इंग्लंड संघाला जर फक्त वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे असेल तर, त्यांना एका डाव्या हाताच्या एका फिरकी गोलंदाजाची आवश्यकता आहे. नाहीतर हा कमकुवतपणा नेहमीच राहील.”
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाविरुद्धच्या लढाईत युवराज सिंगचाही हातभार; राबवणार ‘हा’ मोठा उपक्रम
कमीतकमी २ षटकार मारत सर्वाधिक आयपीएल डाव खेळणारे फलंदाज, यादीत भारतीयांचा बोलबाला
‘तो’ म्हणाला होता, ‘माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल’; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले