युरो कप २०२० च्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी पेनल्टी हुकलेल्या तीन कृष्णवर्णीय खेळाडूंवर सोशल मीडियावरून वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. हे प्रकरण चांगलेच तापू लागल्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन व इंग्लिश फुटबॉल संघटनेने या गोष्टीचा जाहीररीत्या निषेध व्यक्त केला. आता, याच मुद्द्यावरून इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेदेखील संताप व्यक्त केला आहे.
अशी घडली होती घटला
रविवारी(११ जुलै) रात्री उशीरा झालेल्या इंग्लंड विरुद्ध इटली या युरो कप २०२० च्या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत व एक्स्ट्रा टाइममध्ये १-१ बरोबरी राहिल्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. इटलीने पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ असा विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावे केले. इंग्लंडकडून मार्कस रॅशफोर्ड, जेडन सॅन्चो व १९ वर्षीय बुकायो साका या खेळाडूंना पेनल्टी साधण्यात अपयश आले. विशेष म्हणजे हे तिन्ही खेळाडू कृष्णवर्णीय आहेत. त्यामुळे या तिघांवर इंग्लंडच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर वर्णभेदी शब्दांमध्ये टीका करण्यास सुरुवात केली.
पीटरसनने दिली प्रतिक्रिया
या सर्व प्रकरणावर इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन व इंग्लिश फुटबॉल संघटनेने प्रतिक्रिया करीत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता, इंग्लंडचा माजी क्रिकेट कर्णधार केविन पीटरसन याने दोन ट्विट केले. त्याने पहिल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘काल रात्री मी गाडीत डिलनबरोबर घरी येत होतो, तेव्हाची परिस्थिती एकदम भीषण होती. २०२१ मध्ये असे वर्तन? आम्हाला इतका आनंद देणाऱ्या खेळाडूंसाठी द्वेषयुक्त भाषेचा वापर? आपण खरेच २०३० फुटबॉल विश्वचषक आयोजित करण्याच्या पात्रतेचे आहोत का?’
https://twitter.com/KP24/status/1414511769884794881
पीटरसनने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये वर्णभेदी टिपणी करणाऱ्या सोशल मीडिया खात्यांवर कारवाई करण्याबाबत लिहिले, ‘यूकेमधील मीडिया बहुधा जगातील सर्वात शक्तिशाली आहे. ज्यांचे खाते आहे, त्या प्रत्येकाची चौकशी करण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना भाग पाडणे ही त्यांची जबाबदारी असली पाहिजे. असे लोक समाजासाठी हानिकारक आहेत.’
https://twitter.com/KP24/status/1414514829579198467
इंग्लंडने २०३० मध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकासाठी दावेदारी ठोकली असून, त्यांना ते मिळण्याची संधीदेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
युरो कपनंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटूंना आली २०१९ विश्वचषकाची आठवण, इंग्लंड संघाला केले ट्रोल
ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट केल्यास भारतीय खेळाडू होणार कोट्यधीश, महाराष्ट्र सरकार देणार इतके बक्षीस
ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव, ‘या’ स्पर्धेतील दोन सामन्यांना मुकणार