नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी(5 मार्च) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुसरा वनडे सामना पार पडला. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने 8 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने या सामन्यात 120 चेंडूत 116 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10 चौकार मारले.
या सामन्यानंतर विराटने सोशल मीडियावर भारतीय संघाने मिळलेल्या विजयाचे कौतुक केले आहे. विराटच्या या कौतुकाच्या पोस्टवर इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू केविन पिटरसनने कमेंट करत विराटला खास टोपण नाव दिले आहे.
विराटने सोशल मीडियावर या सामन्यातील काही फोटो शेअर केले असून त्याला कॅप्शन दिले आहे की ‘ चमकदार आणि चांगली सांघिक कामगिरी’
विराटच्या या पोस्टवर पिटरसनने ‘किंग बडी’ अशी कमेंट करत विराटला नवीन टोपण नाव दिले आहे.
विराटने केलेले हे शतक त्याचे वनडे क्रिकेटमधील 40 वे शतक आहे. तो वनडेत 40 शतके करणारा सचिन तेंडुलकर नंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र विराटने हा फक्त अकडा असल्याचे म्हटले आहे. तसेच तो म्हणाला, भारतासाठी सामना जिंकल्याने चांगले वाटते.
त्याचबरोबर भारतासाठीही हा विजय खास ठरला आहे. कारण भारताने वनडेमध्ये 500 विजय पूर्ण केले आहेत. असा पराक्रम करणारा भारत ऑस्ट्रेलिया नंतरचा दुसराच देश ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीचा हा अफलातून झेल टीम इंडियाच्या आला कामी…
–जेव्हा एमएस धोनी भरमैदानात चाहत्याला देतो त्रास…, पहा व्हिडिओ
–क्रिकेटमधील डक म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या..