इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम सुरू असून आतापर्यंत ४० पेक्षा जास्त सामने पार पडले आहेत. यानंतर आता संघांच्या प्रदर्शनाला पाहता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने त्या ३ संघांची नावे सांगितली आहेत, जे या हंगामात विजेतेपद मिळवू शकतात. इंग्लंडच्या या माजी क्रिकेटपटू चालू हंगामातील ६० टक्के सामने संपल्यानंतर ही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी आपले आवडते ३ संघ निवडले आहेत, त्यातही गुजरात टायटन्स संघाला अडवणे कठिण आहे, असे पीटरसनचे म्हणणे आहे.
गुजरात संघ (Gujrat Titans) पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरला आहे. मात्र त्यांचे प्रदर्शन एका दिग्गज संघालाही लाजवेल असे राहिले आहे. त्यांनी हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वाखाली आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ८ सामने जिंकले आहेत. गुजरात संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनऊ सुपरजायंट्स अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पीटरसनने (Kevin Pietersen) एका मुलाखतीत सांगितले आहे की, “गुजरात संघ एक असा संघ आहे ज्याला थांबवणे खूप कठीण आहे. तो म्हणाला की, गुजरात संघ सातत्याने सामना जिंकण्याच्या पद्धती शोधत आहे. मग ते सामन्यात मजबूत स्थितीत असो, मध्यम स्थितीत असो वा वाईट स्थितीत असो, त्यांनी सामने जिंकलेच आहेत. जेव्हा तुमच्यात सामना जिंकण्याची मानसिकता असते, तेव्हा त्याला तोडणे फार कठीण होते. जेव्हा मी त्यांच्या संघाला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा ते गुणतालिकेत अव्वलस्थानी नव्हते. परंतु आता त्यांनी या स्थानावर कब्जा केला आहे.”
“गुजरातचा संघ मला राजस्थान रॉयल्स संघाची आठवण करून देतो, जेव्हा त्यांनी २००८ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्त्वाखाली विजेतेपद पटकावले होते. त्यांचा संघ त्यावेळी कागदावर सर्वश्रेष्ट संघ नव्हता, परंतु प्रत्येकाला माहिती होते की, ते काय करू शकतात,” असेही त्याने म्हटले.
तसेच पुढे इतर संघांबाबत बोलताना पीटरसन म्हणाला की, “राजस्थान संघ वास्तवात यावेळी चांगला खेळत आहे. तसेच मला अपेक्षा आहे की, दिल्ली कॅपिटल्सही (Delhi Capitals) त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या ४ संघांमध्ये जाईल. आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या स्पर्धेत हे ३ संघ माझे आवडते संघ आहेत.”
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाबद्दल बोलताना पीटरसन म्हणाला की, “त्यांनी सर्वांनाच हताश केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने हंगामाची सुरुवात चांगली केली होती, परंतु पुढे ते लयीपासून भटकले आहेत.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला इज बॅक’, धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार बनताच सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ
हार्दिकच्या खिलाडूवृत्तीला सलाम! बेंगलोरच्या फलंदाजाचा झेल घेऊनही पंड्या म्हणाला, ‘Not Out’, पण का?
विराटच्या षटकाराने चाहत्यांचा अटकला श्वास, हवाई फटक्यानंतर कोहलीही झाला होता दंग






