---Advertisement---

गॅरी कर्स्टनच्या अचानक राजीनाम्यानंतर केविन पीटरसनने पाकिस्तान बोर्डाला सुनावले, म्हणाला…

---Advertisement---

पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 56 वर्षीय कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) मतभेदांमुळे हा निर्णय घेतला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध सहा महिन्यांतच तुटले. आता कर्स्टनच्या या निर्णयावर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने प्रतिक्रिया दिली आहे. कर्स्टन यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना पीटरसनने पाकिस्तान क्रिकेटला घेरले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज कर्स्टन 2011 मध्ये वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.

पीटरसनने सोमवारी (28 ऑक्टोबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, \पाकिस्तान क्रिकेट प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टनला कसे गमावू शकते? गेल्या आठवड्यात एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आज तुम्ही दोन पावले मागे आला आहात. हे स्वतःशी करणे थांबवा. असे काम करत राहण्यासाठी खूप प्रतिभा लागते.\ पीटरसनच्या या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले की, पाकिस्तानला कोचिंग देणे म्हणजे सर्कसमध्ये काम करण्यासारखे आहे.

दरम्यान पीसीबीने कर्स्टन यांच्या अचानक राजीनाम्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची निवड करताना आणि नवीन कर्णधाराची नियुक्ती करताना कर्स्टन यांचे मत घेतले गेले नाही यामुळे कर्स्टन नाराज होते. यापूर्वी, पीसीबीने संघ निवडीशी संबंधित त्यांचे अधिकार काढून घेतले होते, जे मतभेदांचे मुख्य कारण मानले जात आहे. संघ निवडणे हे आता केवळ निवड समितीचे कार्यक्षेत्र असल्याचे बोर्डाचे म्हणणे होते. पीसीबीने यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन वनडे आणि तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. ही मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबरपासून पाकिस्तानला झिम्बाब्वेमध्ये तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी मर्यादित षटकांच्या संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

INDW vs NZW: न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारताच्या ‘या’ त्रिकुटाला दाखवावी लागेल ताकद!

IPL 2025; केकेआर ‘या’ 5 खेळाडूंना करणार रिटेन? कर्णधाराचा पत्ता कटणार
AUS vs PAK; टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, पण कर्णधाराचीच नाही केली घोषणा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---