एमएस धोनीला भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जाते. आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या नेतृत्वात चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. जेव्हा कधी चेन्नई संघाचा उल्लेख होते, तेव्हा धोनीचे नाव हे नक्कीच घेतले जाते. आयपीएलमध्ये धोनीला सीएसकेव्यतिरिक्त रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करण्याची देखील संधी मिळाली आहे. इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनने आता पुणे संघासोबत धोनीच्या आठवणींचा खुलासा केला आहे.
चेन्नई सुपर किंग्जवर आयपीएल २०१५ नंतर पुढच्या दोन हंगामांमध्ये बंदी घातली गेली होती. याच कारणास्तव एमएस धोनी (MS Dhoni) या दोन हंगामांमध्ये रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळला होता. त्याने २०१६मध्ये पुणे संघाचे नेतृत्व केले, तर पुढच्या हंगामात संघात फक्त खेळाडूच्या रूपात सहभागी झाला. आयपीएल २०२२दरम्यान समालोचकाची भूमिका पार पाडणाऱ्या केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने मान्य केले की, धोनीने त्या दोन हंगामात एका व्यावसायिक खेळाडूच्या रूपात त्याचे १०० टक्के योगदान दिले. पीटरसनच्या मते सीएसकेने २०१८ साली जेव्हा स्पर्धेत पुनरागमन केले, तेव्हा धोनी खूप उत्साहित होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
समालोचन करताना पीटरसन म्हणाला की, “तो पिवळा आउटफिट धोनीसाठी खूप महत्वाचा आहे. मला लक्षात आहे मी त्याच्यासोबत पुणे सुपर जायंट्समध्ये काही हंगामांसाठी खेळत होतो आणि जेव्हा तो स्पर्धेत पुन्हा आला, तेव्हा सीएसकेमध्ये येऊन तो खूप आनंदी होता. तो खूपच व्यावसायिक होता. त्याला जे करता येऊ शकत होता, ते त्याने सर्वोत्तम केले, कारण तो तसाच आहे. तो नेहमी त्याचे १०० टक्के देतो. पुणे संघासाठी त्याने जे देण्याचा प्रयत्न केला, ते अविश्वसनीय होते. सीएसके संघ एमएस धोनीसाठी खूप महत्वाचा आहे, त्याच्यासाठी ते एक कुटुंब आहे.”
दरम्यान, दोन वर्षांची बंदी पार केल्यानंतर २०१८ साली जेव्हा सीएसकेने पुनरागमन केले, त्याच हंगामात धोनीने सीएसकेला विजेतेपद पटकावून दिले होते. त्यानंतर आयपीएल २०२० हंगाम सीएसकेसाठी निराशाजनक राहिला होता, पण २०२१ मध्ये सीएसकेने पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला त्यांचा प्लॅन आधीच माहित होता’, सीएसकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या धवनचा खुलासा
जेव्हा युवराजला पाहून चहलची टरकलेली; म्हणाला, ‘वाटलं होतं ६ षटकार मारेल’
झालं गेलं गंगेला मिळालं! ‘नो बॉल विवादा’वर पॉवेलने सोडले मौन; म्हणाला, ‘ही अशी गोष्ट आहे, ज्याला..’