विराट कोहली याच्यासाठी गुरुवारचा (18 मे) आयपीएल 2023चा 65 वा सामना खूपच खास ठरला. या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खणखणीत शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने सनरायझर्स हैदराबादसाठी पहिल्या डावात हेन्रिक क्लासेन याने शतक पूर्ण केले होते. आता या दोन्ही शतकांची तुलना इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने केली आहे.
यापूर्वी स्पर्धेतून बाहेर पडलेल्या हैदराबादसाठी हेन्रिक क्लासेन याने 51 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. हे त्याचे पहिले आयपीएल शतक ठरले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना विराट कोहली याने 63 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. त्याने संघाला विजय मिळवून देत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. मात्र, या दोन शतकांची तुलना करताना केविन पीटरसन म्हणाला,
“मला वाटते या दोन शतकांपैकी उत्कृष्ट शतक हेन्रिक क्लासेनचे होते. तुम्ही कल्पना करा, आधीच बाहेर झालेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या संघाचा भाग असताना अशी कामगिरी करणे कौतुकास्पद आहे. त्याची खेळी निर्विवादपणे उत्तम होती.”
या विजयानंतर आता आरसीबीची प्ले ऑफ्समध्ये जाण्याची संधी वाढली आहे. आरसीबीचा अखेरचा सामना गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना जिंकल्यानंतर ते 16 गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. मुंबईने आपला अखेरचा सामना जिंकला तरी सरस धावतीच्या जोरावर आरसीबी प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरू शकते. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद आपला अखेरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना जिंकून ते स्पर्धेचा विजयी समारोप करण्याचा प्रयत्न करतील.
(Kevin Pietersen Said Klassen Century Better Than Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतकानंतर विराट कोहली ऑस्ट्रलियन गोलंदाजांच्या निशाण्यावर! डब्ल्यूटीसी फायनलआधी स्वतः रिकी पाँटिंगचा खुलासा
फाफ डू प्लेसिस विश्वचषकात खेळलाच पाहिजे! भारतीय दिग्गजाचा दक्षिण आफ्रिका बोर्डाला सल्ला