आयपीएल 2023 हंगाम अखेरीकडे आला आहे. हंगामातील अखेरचे सामने शिल्लक असताना आता अनेक समीक्षक आपापली प्रतिक्रिया देत आहेत. या स्पर्धेमध्ये समालोचन करत असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक केविन पीटरसन याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम फिनिशर म्हणून कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंग याचे नाव घेतले.
केविन पीटरसन हा सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. तो अनेक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देत असतो. नुकतेच प्रसारण वाहिनीशी बोलताना त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम फिनिशर म्हणून रिंकू सिंगचे नाव घेतले. पीटरसन म्हणाला,
“या स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप पाडलेली आहे. मात्र, सामना संपवण्याची कुवत पाहता रिंकू सिंग या हंगामातील सर्वोत्कृष्ट फिनिशर वाटतो. त्याने अत्यंत जबाबदारीने खेळ करत, संघाच्या विजयात योगदान दिले आहे.”
मागील जवळपास पाच पाच वर्षांपासून केकेआर संघात असलेला रिंकू यावर्षी आपली सर्वोत्तम कामगिरी करताना दिसला. गुजरात टायटनविरुद्ध केकेआरला अखेरच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज असताना त्याने अखेरच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारत एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या व्यतिरिक्तही देखील त्याच्या बॅटमधून अशाच काही दमदार खेळ्या आल्या.
त्याची या हंगामातील कामगिरी पाहिल्यास दिसून येते की, त्याने 13 सामने खेळताना 50.88 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 143 पेक्षा जास्त राहिला. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या बॅटमधून तब्बल 25 षटकार आले आहेत.
(Kevin Pietersen Said Rinku Singh Is Best Finisher Of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज कर्णधाराचे निधन, क्रिकेटविश्वावर दु:खाचा डोंगर
दिल्लीविरुद्ध भिडण्यापूर्वी धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! चेन्नईचा कोचच म्हणाला, ‘तो 100 टक्के…’