भारतासह जगातील अनेक देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. यात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील अडकला आहे. त्याचा कोरोना व्हायरसचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबद्दल त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. मात्र, यानंतर केविन पीटरसनने अप्रत्यक्षरित्या एक ट्विट करत टोमणा मारला. त्यावर माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन कोरोना पॉझिटिव्ह
सचिनने त्याच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती देताना ट्विट केले की ‘माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी मागील काही काळापासून सतत चाचण्या करत होतो. काही सौम्य लक्षणे आढळल्याने मी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. माझ्या कुटुंबातील इतर कोणालाही या आजाराची लागण झाली नाही.’
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
पीटरसन-युवराजमध्ये गमतीर संभाषण
सचिनने तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगितल्यानंतर काहीवेळातच पीटरसनने ट्विट केले की ‘मला कोणी सांगू शकेल का की कोविड-१९ची लागण झाल्याचे जगाला घोषित करुन सांगण्याची गरज का वाटते?’
पीटरसनने असे ट्विट करत अप्रत्यक्षरित्या सचिनवर निशाणा साधल्याचा कयास अनेक ट्विटरकर्त्यांनी लावला.
https://twitter.com/KP24/status/1375732152361492480
तसेच पीटरसनच्या या ट्विटवर युवराजने प्रतिक्रिया दिली की ‘तुझ्या डोक्यात हा विचार आजच कसा आला, याआधी का नाही आला?’ त्यापुढे युवराजने तो फक्त पीटरसनची मजा घेतोय अशीही प्रतिक्रिया दिली.
And how come you thought of this today and not before ? ????
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 27, 2021
Haha just pulling you leg bud ! ????
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 27, 2021
युवराजच्या या प्रतिक्रियेला पीटरसनने प्रतिउत्तर देताना म्हटले की ‘आत्ताच पाहिलं की सचिनलाही लागण झाली आहे. सॉरी सचिन, लवकर बरा हो, मित्रा.’
https://twitter.com/KP24/status/1375739494696157185
युसूफ पठाण देखील कोरोना पॉझिटिव्ह
सचिन पाठोपाठ भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. विशेष म्हणजे सचिन आणि युसूफ हे काही दिवसांपूर्वी रायपूर येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज २०२१ स्पर्धेत एकत्र खेळले होते. तसेच या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघात सचिन आणि युसूफसह युवराजचाही समावेश होता. त्याचबरोबर या स्पर्धेत इंग्लंड लिजेंड्स संघाचे पीटरसनने नेतृत्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनपाठोपाठ दोन वेळचा विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती
डिव्हिलियर्स आरसीबीसाठी यष्टीरक्षण करणार का? माईक हेसन यांनी दिले ‘हे’ उत्तर






