लंडन । इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याचं ट्विटर अकाऊंट नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ब्लॉक केले गेले आहे. ब्रिटीश पत्रकार पायर्स मॉर्गन यांनी शनिवारी ही माहिती दिली.
मॉर्गन (Piers Morgan) ट्विटरवर म्हणाला, “ब्रेकिंग… मला मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल पीटरसनला (Kevin Pitersen) ट्विटरवरून निलंबित करण्यात आले. परंतु हा एक स्पष्ट विनोद होता. कृपया त्याचे ट्विटर पुन्हा सुरु करा”
मॉर्गनने त्या ट्विटसह एक स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ट्विटरने पीटरसनला सांगितले आहे, की नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे अकाउंट ब्लॉक केले गेले आहे.
ट्विटरने सांगितले, “कृपया हे जाणून घ्या की परत परत नियमांचे उल्लंघन केले, तर तुमचे खाते कायमचे निलंबित केले जाऊ शकते. आपल्या अकाऊंटची समस्या सोडविण्यासाठी ट्विटरच्या प्रक्रियेला फॉलो करा.”
BREAKING: Kevin Pietersen suspended from Twitter for threatening to slap me… 🤣
Amusing though this is, it was an obvious joke and a) I don’t feel remotely harassed b) he can’t slap his way out of a paper bag. So, please reinstate him @TwitterUK – this is ridiculous. 👇 pic.twitter.com/kbkCKuDWdm— Piers Morgan (@piersmorgan) July 4, 2020
विशेष म्हणजे इंग्लंडचा माजी फलंदाज पीटरसन म्हणाला होता, की संधी मिळाल्यावर मॉर्गनला चापट मारील. तो म्हणाला, “पियर्स मॉर्गन जेव्हा मी तुला पाहील, तेव्हा मी तुम्हाला चापट मारणार, तो काही मूर्खपणा नसणार आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पतीच्या जागेवर पत्नीने केले यष्टीरक्षण
-असे ४ साधारण क्रिकेटपटू, जे पुढे जाऊन बनले महान कोच
-भारतात टीक टॉक ऍपवर बंदी घातल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने दिली ही प्रतिक्रिया