---Advertisement---

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पतीच्या जागेवर पत्नीने केले यष्टीरक्षण

On: रविवार, जुलै 5, 2020 4:25 PM
---Advertisement---

मुंबई । क्रिकेटच्या मैदानात नेहमीच काहीतरी आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडत असतात. युरोपियन क्रिकेट सिरीज टी10 लीगमध्ये असाच काही प्रकार घडून आला. पण हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. या लीगमधील उपांत्य सामन्यात एक इतिहास घडला. एका यष्टीरक्षकाच्या जागी त्याची पत्नी यष्टीरक्षक म्हणून सामन्यात उतरली. 

केऐसवी क्रिकेट क्लबकडून फिन सदारंगांनी यष्टीरक्षक म्हणून खेळत होता. पण फिनने या सामन्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याची पत्नी शरान्या सदारंगानीने यष्टीरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानंतर ती शरान्या सदारंगानी अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. यापूर्वी क्रिकेटमध्ये असे कधीच पाहण्यात आले नव्हते.

युरोपियन क्रिकेट सिरीज टी 10 लीगमध्ये खेळणारी ती पहिली महिला आहे. तसेच शरान्या ही मूळची भारतीय आहे.

https://twitter.com/EuropeanCricket/status/1277625428937768961

शरान्या सदारंगानी आणि फिन या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. विशेष म्हणजे शरान्याच्या पतीने तिचे आडनाव लावले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

महेश बाबूची पत्नी आणि मिस इंडिया नम्रता शिरोडकरचा हा आहे आवडता क्रिकेटर

‘हा’ माजी कर्णधार ड्रेसिंगरुममध्ये आला की सगळे खेळाडू जायचे पळून

गुरु पौर्णिमा- आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---