भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. आयपीएल 2023 मध्येही राहुलचा हा खराब काळ सुरू असल्याचेच दिसले. बुधवारी (19 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएलच्या चालू हंगामातील 26व्या सामन्यात आमने सामने आले. या सामन्यातील राहुलचे सुमार प्रदर्शन पाहून इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार केवीन पीटरसन देखील त्रस्त झाला.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG) संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आला. निर्धारित 20 षटकात लखनऊने 7 बाद 154 धावा केल्या आहेत. आयपीएळ 2023 मध्ये आतापर्यंत इतर संघांचे प्रदर्शन पाहता, ही धावसंख्या तुलनेने कमीच आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि कायन मेयर्स या सलामीवीर जोडीने संघाला सुमार सुरुवात दिल्यानेच संघ मोठी धावसंख्या करू शकला नाही, असे बोलले जात आहे. पावर प्लेच्या 6 षटकांमध्ये लखनऊची धावसंख्या अवघी 37 धावा होती.
पावरप्ले नंतरही संघाच्या धावगतीत काही खास बदल पाहायला मिळाला नाही. याच कारणास्तव समालोचन करणाऱ्या केवीन पीटरसन () याचा तोंडावरील ताबा सुटला. पीटरस म्हटल्याप्रमाणे ही त्याने पाहिलेली सर्वात बोरिंग खेळी होती. “पावरप्लेमध्ये केएल राहुलला फलंदाजी करणारा पाहणे, हे मी केलेले सर्वात बोरिंग काम आहे,” असे पीटरसन समालोचनादरम्यान म्हणाला. दरम्यान, पावर प्लेमध्ये राहुलने एकूण 19 चेंडू खेळले आणि 19 धावा केल्या.
राहुलचे या सामन्यातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने 32 चेंडूत 121.87 च्या सरासरीने 39 धावा केल्या. कायल मेअर्स याने 42 चेंडूत 51 धावा केल्या. राजस्थानसाठी रविचंद्रन अश्विनने सर्वोत्तम गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली. (Kevin Pietersen’s venomous criticism of KL Rahul’s batting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्ससाठी अजून एक मोठा धक्का! दुखापतग्रस्त खेळाडू संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर
रेकॉर्ड ब्रेक! लखनऊविरुद्धच्या पहिल्याच षटकात बोल्टने मोडला इरफान पठाणचा विक्रम