भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला ट्विटरवर अनेक वेळा ट्रोल केले आहे. आता जाफरने माजी इंग्लिश फलंदाज केविन पीटरसनला ट्रोल केले आहे. वसीम जाफरने पीटरसनच्या ट्विटला उत्तर देताना एक मिम शेअर करून त्याची खिल्ली उडवली आहे.
खरं तर, इंग्लंडचे माजी फलंदाज केविन पीटरसन भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या निकालाची भविष्यवाणी जाहीर करताना म्हणाले होते, “मोईन अली रविवारी सहा बळी घेईल आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी होईल.” म्हणजेच भारत हा कसोटी सामना गमावेल असा पीटरसनचा इशारा होता.
https://twitter.com/KP24/status/1430839104372084736
यावर, वसीम जाफरने पीटरसनची खिल्ली उडवली आणि म्हणाला, ‘मी विचार करत आहे की रविवारी भारत कसा फलंदाजी करेल.’ यासोबतच जाफरने प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील जेठालाल यांचे एक मिम पोस्ट केला करत फिरकी घेतली आहे.
Trying to work out how India will be batting on Sunday😜 #ENGvIND https://t.co/vbnnLG6fns pic.twitter.com/SzZIz7PKco
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 26, 2021
दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 432 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर इंग्लंडने 354 धावांनी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात भारताला 78 धावांवर बाद केले होते. इंग्लडच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे भारतीय संघावर शंभरीच्या आत सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावली आहे.
कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना निराश केले आहे, तो अवघ्या 7 धावा करून माघारी वळला. लॉर्ड्स कसोटीत शतक करणारा केएल राहुल भोपळाही न फोडता बाद झाला. दुसरीकडे पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. रोहित शर्मा(19) आणि अजिंक्य रहाणे(18) यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरण्याचा प्रयत्न केला, पण तेही अपयशी ठरले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेच्या प्रशिक्षण सत्रात धोनी दिसला नव्या भूमिकेत, दीपक चाहरने जिंकला मजेदार गेम
माजी कर्णधार बनणार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष? पंतप्रधान घेणार अंतिम निर्णय
केविन पीटरसनने मोईन अलीले नाव घेत तिसऱ्या कसोटीबद्दल केली भविष्यावाणी; म्हणाला…