यूएई दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिज संघाने शारजाह येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत यजमानांचा सफाया केला. 9 जून रोजी खेळल्या गेलेल्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, वेस्ट इंडिजने यूएईचा 4 गडी राखून पराभव केले.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) फिरकी गोलंदाज केविन सिंक्लेअरने (Kevin Sinclair) अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने अवघ्या 7.1 षटकात एकूण 24 धावा देत 4 बळी घेतले आहेत. मैदानावर विकेट घेतल्यानंतर त्याने खास पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्याने कोलंटी उडी मारत आपला उत्साह साजरा केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.
खरं तर, शारजाह येथे खेळल्या गेलेल्या यूएई आणि वेस्ट इंडिज (UAE vs WI) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (ODI Series), कॅरेबियन फिरकी गोलंदाज केविन सिंक्लेअरने एकूण 4 विकेट घेतल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यूएई फ्लॉप दिसला. त्याच वेळी महंमद वसीमने 42 धावांची खेळी केली.
दरम्यान, लवप्रीत सिंगने केवळ 3 धावा केल्या. अरविंदने 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, तर रमीझ शहजादने 27 धावांचे योगदान दिले. अशा स्थितीमध्ये एकही फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. केविनने 4 विकेट घेतल्या आणि यादरम्यान त्याने मैदानावर खास सेलिब्रेशनही केले आहे. विकेट घेतल्यानंतर त्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता. केविनने मिडल ग्राउंड बॅकफ्लिप मारून आनंद साजरा केला.
The Kevin Sinclair jump. pic.twitter.com/SaasRk03xd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 9, 2023
Kevin Sinclair jump.pic.twitter.com/0f1q2ZUync
— Cricket With Abdullah ???? (@Abdullah__Neaz) June 9, 2023
शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाची कामगिरी अशी होती
यूएईने दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खराब झाली मात्र, 35 धावांवर पहिली विकेट पडली. जॉन्सन चार्ल्स अवघ्या 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वेस्ट इंडिजचा पदार्पण करणारा अॅलिक अथानाजने शानदार खेळी केली. 45 चेंडूंचा सामना करताना अथनाजने 9 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावा केल्या. तर, शामर ब्रूक्सने 39 धावांचे योगदान दिले. या सामन्यात कर्णधार रोस्टन चेसने 27 धावा केल्या. रॅमन रेफरने मॅच फिनिशरची भूमिका बजावली तसेच त्याने 30 चेंडूत 15 धावा करत सामना संपवला.
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं
अरे देवा!