---Advertisement---

खलील अहमदसाठी उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने ओतला पैसा, पाहा किती रुपयांना केले खरेदी?

Khaleel Ahmed
---Advertisement---

मार्च महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी खलील अहमद याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली.

आयपीएल २०२१ चा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाने अहमदला ५ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले आहे. भारताच्या या वेगवान गोलंदाजाला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा सुरू होती. अखेर दिल्लीने बाजी मारत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्याची मूळ किंमत फक्त ५० लाख होती. 

आयपीएल २०२१ मध्ये अहमदने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु त्यांनी आयपीएल २०२२ साठी त्याला रिलीज केले होते. त्यामुळे तो लिलावात उतरला होता. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने २४ सामने खेळताना ३२ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुभवी ऑलराऊंडर्स अनसोल्ड तर नवख्या खेळाडूंनी केली कोट्यावधींची कमाई! पाहा संपूर्ण यादी

IPL Auction: भारताविरुद्ध दमदार कामगिरी करणारा ओडियन स्मिथ पंजाब संघात दाखल; एवढ्या कोटींची लागली बोली

हे माहितंय का? सर्व फ्रँचायझींकडून ‘या’ दिग्गजांनी लावल्या बोली, पाहा काव्या मारनपासून नीता अंबानीपर्यंतची यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---