---Advertisement---

‘मला रोहित नाही तर विराटसोबत खेळायला अधिक आवडते,’ ‘या’ वेगवान गोलंदाजाचा खुलासा

On: शुक्रवार, ऑगस्ट 21, 2020 6:33 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा युवा गोलंदाज खलील अहमदने सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वात २०१८ साली आशिया चषकात भारतीय संघात पदार्पण केले होते. या स्पर्धेत विराटला विश्रांती दिल्यामुळे संघाचे नेतृत्व रोहितने केले होते. अहमदने हाँगकाँगविरुद्ध आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच ३ विकेट्स घेतले होते. त्यानंतर त्याला अफगाणिस्तानविरुद्धही खेळण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेत त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली होती.

वेस्ट इंडिजविरुद्ध खलीलला ४ वनडे सामन्यात संधी मिळाली आणि त्याने ५.३४ च्या इकॉनॉमी रेटने ७ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतही त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. खलीलने नुकत्याच एका मुलाखतीत उपकर्णधाराबद्दल चर्चा केली, ज्यांच्यासोबत तो खेळला आहे.

अहमदने विराटच्या नेतृत्वाबाबत बोलताना म्हटले की, तो आक्रमक अंदाजात खेळतो, तर रोहित शर्माबद्दल बोलताना तो म्हणाला की, तो खूप शांत आणि स्थिर आहे. तो पुढे म्हणाला, “विराट आणि रोहितच्या नेतृत्वाची शैली वेगळी आहे. विराट खूपच आक्रमक आहे. जर कोणताही फलंदाज षटकार किंवा चौकार ठोकत असेल, तेव्हा तो येतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो तसेच म्हणतो की त्याला बाऊंसर टाक. तो आक्रमकतेसोबत तुमच्यात ऊर्जा निर्माण करण्याचाही प्रयत्न करतो.”

रोहितबद्दल बोलताना तो म्हणाला की, “तो खूपच शांत आहे. तो येतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो. तो तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देतो आणि म्हणतो की, तू आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेस. आणि तुला माहिती आहे की कशाप्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. आता जा, गोलंदाजी कर आणि फलंदाजाला बाद कर.”

त्याने हेदेखील म्हटले की, “मी आक्रमक आहे त्यामुळे मला विराटच्या नेतृत्वात खेळायला अधिक आवडते.” अहमदने आतापर्यंत विराट, रोहित आणि एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.

अहमदने विराट आणि रोहितबद्दल म्हटले की, “ते कोणतीही गोष्ट करण्यासाठी आग्रह करत नाही. ते दोघेही येतात आणि मग तुम्हाला तुमचे मत विचारतात. त्यानंतर आपले मत मांडतात.” विराटबद्दल बोलताना तो म्हणाला की, “तो नेहमी त्याला मार्गदर्शन करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याने खूप चांगली कामगिरी केली नव्हती, तरीही विराटने त्याला खूप पाठिंबा दिला होता.”

अहमदने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ११ वनडे आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत ३१ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने ३५.३० च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-जेव्हा घनिष्ठ मित्र असलेल्या रैनावरच चढला होता धोनीचा पारा; या माजी खेळाडूने सांगितला किस्सा

-सचिन विराटच्या बॅटची काळजी घेणारा देतोय मृत्यूशी देतोय झुंज, काही क्रिकेटरकडून तर…

-इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?

ट्रेंडिंग लेख-

-५ वेळा क्रिकेट इतिहासात गोलंदाज झाले ओपनर, केल्या धमाकेदार खेळी

-राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण

-जगातील ५ असे उपकर्णधार, ज्यांना कर्णधार केले असते तर झाले असते महान कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---