पुणे । बालेवाडी पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया गेम्समध्ये २१ वर्षाखालील मुलांच्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात चंदिगड संघाने तामिळनाडूचा ४१-४० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
कबड्डीच्या इतिहासात प्रथमच असा सामना झाला जो टाय झाल्यानंतर अतिरिक्त वेळेत खेळवण्यात आला. सामना मध्यांतरला १७-१७ असा बरोबरीत होता तर पूर्ण वेळेत सामना ३६-३६ असा बरोबरीत राहिला.हा सामना प्रो कबड्डीच्या नियमानुसार हे सामने खेळवण्यात आले होते. त्यामुळे ५-५ चढाई न देता अतिरिक्त ३-३ मिनिटांचा वेळ वाढवून सामना खेळवण्यात आला.
अतिरिक्त वेळेत सामना ४०-३९ असा तामिळनाडूने जिंकला होता परंतु सामना संपवण्याआधीच तामिळनाडूच्या संघाने मैदानात येऊन सेलिब्रेशन केलं. त्यामुळे पंचांनी एक तांत्रिक गुण चंदीगड संघाला दिला आणि अतिरिक्त वेळेत देखील सामना ४०-४० असा बरोबरीत राहिला.
अतिरिक्त वेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर सुवर्ण चढाईसाठी टॉस करण्यात आला. त्यामध्ये चंदीगड संघाला सुवर्ण चढाई करण्याची संधी मिळाली. चंदीगडच्या चढाईपटूने गुण मिळवत संघाला ४१-४० असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
कबड्डीच्या इतिहासात पहिल्यादा असं घडलं की अतिरिक्त वेळ देऊन सामना खेळवण्यात आला. प्रो कबड्डीच्या नियमानुसार बरोबरीत राहिलेला सामना ५-५ चढाईमध्ये खेळवण्यात येत नाही. सामन्यात अतिरिक्त वेळ देऊन सामना खेळवण्यात येतो.
Khelo India Under 21 Boys Final Match
Golden Raid #Kabaddi #KheloIndia pic.twitter.com/L6T5yPpA0h— Anil Bhoir Kabaddi (@AnilBhoir24) January 18, 2019
सुवर्णचढाई म्हणजे नक्की काय ?
१. पाच-पाच चढाई नंतरही जर सामना समान गुणांवर असेल तर चढाई करीता नव्याने नाणेफेक जिंकेल त्या संघास सुवर्ण चढाई करण्याची संधी दिली जाते.
२. सुवर्ण चढाई नंतरही सामना समान गुणांवर असेल तर प्रतिपक्षास सुवर्ण चढाई करण्याची संधी दिली जाईल.सुवर्ण चढाईत जो संघ निर्णायक गुण मिळवेल तो संघ विजयी ठरतो.
३. यानंतरही सामना समान गुणांवर संपला तर नाफेफेक करून सामना निर्णायक केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या-
–आठ वर्षांनी मालिकावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या धोनीचा असाही एक विक्रम
–एमएस धोनीने अखेर ‘ती’ खास शंभरी गाठलीच!
–ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील अशी आहे एमएस धोनीची खास कामगिरी