खो खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचा 100-40 च्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीच्या सामन्यात सर्व खेळाडूंनी अटॅक आणि डिफेंसमध्ये दमदार कामगिरी दाखवली. प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत आपले सर्वस्व पणाला लावले आणि पुन्हा एकदा जागतिक स्तरावर देशाचा झेंडा उंचावला.
भारताने खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंका नमवलं. श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम डिफेंसचा निर्णय घेतला. भारताला पहिल्यांदा अटॅक करण्याची संधी मिळाली. ज्यात पहिल्याच डावात अटॅक करताना संघाने 58 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या डावात डिफेंस करताना 16 गुण गमावले. त्यामुळे दुसऱ्या डावाअखेर भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुणांचा फरक 42 वर आला होता. त्यामुळे लंकेला तिसऱ्या डावात मोठी आघाडी घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तिसऱ्या डावात जास्तीत जास्त खेळाडू बाद करण्याचं आव्हान होतं. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात भारताला एकही ड्रीम गुण मिळवता आला नाही. तिसऱ्या डावात भारताने अटॅक करत 100 गुण मिळवले. तर श्रीलंकेच्या पारड्यात फक्त 18 गुण होते. भारताकडे 82 गुणांची आघाडी होती. यानंतर चौथ्या डावात श्रीलंकेने 22 गुण मिळवले. आखेरीस लंकेचे 40 गुण झाले. भारताने हा सामना 100-40 ने जिंकला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
#TeamIndia dominates the Quarter-finals of #KhoKhoWorldCup 2025 with a commanding win over Sri Lanka! 🔥
📸 Check out the highlights from their sensational victory! 😍
Don’t miss a moment of #KKWC2025 – on our website🔗 https://t.co/fKFdZBc2Hy or download the app 👉… pic.twitter.com/YNTIGEINDp
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 17, 2025
भारतीय पुरुष संघ आज शनिवारी 18 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामना खेळेल. टीम इंडिया ही मॅच जिंकून फायनलमध्ये आपले स्थान पक्के करण्याचे प्रयत्न करेल. टीम इंडियाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे आणि अद्याप एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेसाठी भारताला हरवणे सोपे राहणार नाही.
हेही वाचा-
रणजी ट्राॅफी न खेळल्यास कोहलीचा इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून होणार पत्ता कट?
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी कधी होणार भारतीय संघाची घोषणा? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
भारतीय संघात पुनरागमन करणार करुण नायर? म्हणाला, “माझी निवड होईपर्यंत…”